शिवसाई मित्र मंडळ दाभीळ (पाटीलवाडी) यांचा त्रैवार्षिक सोहळा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : दापोली : प्रमोद तरळ :-‌ शिवसाई मित्र मंड ळाच्या वतीने दर तीन वर्षांनी संपन्न होणारी श्री सत्यनारा यण महापूजा यंदा ११ मे २०२५ रोजी अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात पार पडली.
  • या पावन प्रसंगाने गावातील विविध वयोगटांतील ग्रामस्थां ना एकत्र आणून एक सुंदर सामूहिक अनुभव दिला.
  • सकाळी श्री सत्यनारायणाची मंगलमय महापूजा, लहान मुलां साठी: बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी रचना त्मक खेळ
  • महिलांसाठी : उत्साही संगीत खुर्ची स्पर्धा
  • पुरुषांसाठी : पारंपरिक मटका फोड स्पर्धा
  • हळदी-कुंकू समारंभ – महिलांचा गौरव:
  • गावातील महिलांच्या सहभागासाठी सन्मान करण्यात आ ला मंडळातील माहेर वाशीनींना “माहेरची ओठी” आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • या समारंभाने महिलांच्या योगदानाला मान्यता देत सामा जिक सन्मानाची जाणीव निर्माण केली. सायं. भक्तिमय भजन व रात्री सर्व ग्रामस्थ, पाहुणे व मित्रपरिवारासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
  • तसेच गावातील विविध वाड्यांतील समाजसेवक, कार्यक र्ते आणि मान्यवरांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व गावाच्या विकासासाठी ज्यांचे मोलाचे योगदान आहे.
  • अशा ग्रामस्थ बांधवांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • सन्मानित व्यक्तींची यादी:1. श्री.सुरेश शिंदे – साळीवाडी, 2. श्री.धोंडू शिगवण – तांबवाडी, 3. श्री.महादेव मोरे – मोरेवाडी, 4. श्री.गणेश करंजकर – पाटीलवाडी, 5. श्री. काशिनाथ भेकरे – डांबूकवाडी, 6. श्री.किशोर गुरव – सु तारवाडी 7. श्री.सुनील जाधव – बौद्धवाडी, 8. श्री. तुका राम राऊत – तेलीवाडी, 9. श्री.संतोष कांबरे – भोईवाडी,
  • 10. श्री.अकबर दळवी् मोहल्ला,11. श्री.शरद मळेकर,
  • 12. श्री.प्रमोद करंजकर 13. नामवंत शाहीर श्री.रत्नाकर महाकाळ तसेच दिनेश राऊत,बाबू मोरे,रवींद्र आग्रे, गौतम नेवरेकर,, संदीप सावरटकर, प्रकाश जाधव, शांताराम तां बे, राजन कांबरे, सुभाष कांबळे, मिलिंद शिंदे, संदेश चिंच‌ घरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
  • शाहीर श्री. रत्नाकर महाकाळ यांचे प्रबोधनात्मक भारूड, खेड -आयानी येथील प्रसिद्ध शाहीर सन्मा. श्री.रत्नाकर महाकाळ यांच्या समाजप्रबोधनपर भारूडाने कार्यक्रमात वैचारिक ठसा उमटवला.
  • त्यांची प्रभावी वाणी, विषयांची समर्पक मांडणी आणि समाजहिताची साद यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसाई मित्र मंडळाचे सदस्य सचिन पाटील, शुभम पाटील, संतोष पाटील, संदेश पाटील, विशाल पाटील, सखाराम पाटील, दिनेश पाटील, मनीषा पाटील, निलेश पाटील, स्वरांश पाटील, राहुल पाटी ल, नरेश पाटील, आदित्य पाटील, कल्पेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
  • तसेच शिवसाई महिला मंडळाचे समर्पित सहकार्य कार्यक्रमास विशेष बळ देणारे ठरले.
  • एकता, सौहार्द आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देणा ऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकता, समता, सहकार्य आणि प्रेमभावनेचा प्रेरणादायी संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचला.
  • ग्रामस्थांनी अशाच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या सातत्यपूर्ण आयोजनाची अपेक्षा व्यक्त केली.
  • सर्वांच्या सहकार्या बद्दल शिवसाई मित्र मंडळ आणि शिव साई महिला मंडळ – दाभीळ (पाटीलवाडी) यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles