पेंडखळे पेंडखळकर वाडीतील ब्राम्हणदेव मंदिर वहाळावरील लोखंडी साकव कोसळला ; जनतेची मागणीची दखल घेत आ.किरण सामंत यांचे त्वरित दुरुस्तीचे आदेश.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पेंड खळे येथील पेंडखळकर वाडीतील ब्राम्हणदेव मंदिराजव ळील वहाळावर असलेला लोखंडी साकव शनिवारी झाले ल्या मुसळधार पावसात कोसळल्याने जनतेबरोबर शाळ करी मुलांची मोठी गैरसोय होत असून.
  • या घटनेची आ.किरण सामंत यांनी तत्काळ दखल घेऊन साकवांच्या दुरुस्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिले आहेत.
  • दरम्यान जि.प.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन साकव दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
  • या साकवाच्या लोखंडी पट्ट्या जीर्ण झाल्याने सदर पड झड झालेला साकव दुरुस्त करावा असा ग्रामपंचायतीने ठरावही केला होता.
  • तशी मागणीही गेल्या तीन वर्षांपासून पेंडखळकर वाडीती ल जनतेने केली होती तरीही जि.प.बांधकाम विभागा कडून सातत्याने दुर्लक्ष होत होते.
  • परंतु शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसाने साकव पड ल्याने ग्रामस्थ तसेच शाळकरी विद्यार्थ्याची मोठी गैरसोय होऊ लागली.
  • या साकवावरुन पेंडखळे,केळवडे तसेच अन्य गावातून ग्रा मस्थ ये-जा करत असतात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाबद्दल तालुक्यातील जनतेच्या अनेक तक्रारी असू न त्यावर पांघरूण घालण्याचे काम काही राजकीय पुढारी करत असल्याचे जनतेच्या गंभीर तक्रारी असून आता आ. किरण सामंत यांनी याकडे लक्ष द्यावे अशीही मागणीही आता जोर धरू लागली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles