
धाराशिव जिल्ह्यात ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान दिव्यांगांसाठी कॅलिपर्स मोजमाप व फिटनेस शिबिरे….! अलिम्को आणि जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम: दिव्यांग बांधवांनी लाभ घेण्याचे तानाजी घोडके यांचे आवाहन.
- प्रतिनिधी : फारूक शेख :-धाराशिव जिल्ह्यातील दिव्यां ग बांधवांसाठी अलिम्कोच्या (ALIMCO) माध्यमातून विशेष कॅलिपर्स मोजमाप व कॅलिपर फिटनेस शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद धाराशिव, समग्र शिक्षण विभाग, गटशिक्षण कार्यालये आणि जिल्हा ग्रामीण रुग्णा लय यांच्या संयुक्त समन्वयाने ७ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तालुकानिहाय या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
- या विशेष शिबिरांमध्ये दिव्यांग विद्यार्थी आणि इतर लाभा र्थ्यांची कॅलिपर्ससाठी आवश्यक असणारी शारीरिक मोज मापे घेतली जातील.

- तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी व फिटनेस प्रमाणपत्र प्र क्रिया पूर्ण करून, पात्र लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार मो फत कॅलिपर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- तरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- असे आहे तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक:
- दिनांक तालुका वेळ शिबिराचे ठिकाण
- ७ ऑक्टोबर २०२६ परंडा सकाळी ९ ते दुपारी १ गटशिक्ष ण कार्यालय, परंडा
- ७ ऑक्टोबर २०२६ भूम दुपारी २ ते ६ गटशिक्षण कार्याल य, भूम
- ८ ऑक्टोबर २०२६ उमरगा सकाळी ९ ते १ गटशिक्षण कार्यालय, उमरगा
- ८ ऑक्टोबर २०२६ लोहारा दुपारी २ ते ६ गटशिक्षण का र्यालय, लोहारा
- ९ ऑक्टोबर २०२६ वाशी सकाळी ९ ते १ गटशिक्षण का र्यालय, वाशी
- ९ ऑक्टोबर २०२६ कळंब दुपारी २ ते ६ गटशिक्षण का र्यालय, कळंब
- १० ऑक्टोबर २०२६ तुळजापूर सकाळी ९ ते १ गटशिक्ष ण कार्यालय, तुळजापूर
- १० ऑक्टोबर २०२६ धाराशिव दुपारी २ ते ६ गटशिक्षण कार्यालय, धाराशिव
- या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्ष ण अधिकारी कार्यालये, जिल्हा ग्रामीण रुग्णालये, तसेच तालुका स्तरावरील आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिका री व कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.
- शिबिराच्या पूर्वतयारीपासून ते थेट साहित्य वाटपापर्यंत च्या सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित यंत्र णांना आवश्यक त्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
- दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: तानाजी घोडके
- “धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना आवश्यक सहाय्यक साधने मिळावीत आणि त्यांच्या दैनं दिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात, हा या शिबिरा चा मुख्य उद्देश आहे.
- कॅलिपर्सची आवश्यकता असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या जवळच्या तालुक्या च्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहून मोजमाप व फिटनेस तपासणी करून घ्यावी,”
- असे आवाहन दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष तानाजी दत्तात्रय घोडके यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






