
विद्यार्थी आणि समाज घडवणारे सर्वगुणसंपन्न गुरुवर्य संदीप परटवलकर गुरुजी.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मिळं द गावचे सुपुत्र,सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा आ णि शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग बहुआयामी व्यक्तिमत्त्व आ द.संदीप बा. परटवलकर गुरूजी यांचा ५० वा वाढदिवस साजरा होत असताना यानिमित्ताने प्रत्येक मुलांनी आदर्श घ्यावा असा आपला जीवन प्रवास, घरची परिस्थिती अत्यं त हालाखीची, वडीलांचा वडिलोपार्जित व्यवसाय यातून पाच दहा रुपये मिळाले तर मिळाले.
- नाहीतर वर्षाला धान्य दिले जाई, कुटुंबात दोन बहिणी आ णि दोन भाऊ, वडीलांचा उंच गोरापान रूबाबदार देह आणि तेवढीच हजरजबाबी गोड वाणी, या गोड वाणीतून आपल्या व्यवसाया बरोबर लोकांच्या कौटुंबिक व खाजगी अडचणीत सम्यक मार्ग काढणे यात ते सर्वत्र परीचित होते.
- उपजत वारसा हक्काने मिळालेल्या संधीचे परटवलकर गु रूजींनी सोने केले बालपणी गोंडस चेहरा तेवढीच चुणचु णीत बाल वाणी अभ्यासातील हुशारी त्या गरीबीतील कपड्यांत ही शोभून दिसत होती.
- त्यामुळे सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणून ओळख होती. ‘कै. आत्माराम आयरे विद्यालय मिळंद या विद्याल याला अनेक महान शिक्षक जे रूजू होवून सेवानिवृत्त होई पर्यंत लाभले असे,आद.कदम सर, घाडगे सर, डी.ए घाडगे सर, पाटील, गुरव सर, महाडिक सर, डोंगरकर सर, यांनी या दुर्गम भागात शिक्षक, वकील, डाॅक्टर, सरकारी अधि कारी असे अनेक होतकरू विद्यार्थी घडवले.
- १९८६ ते १९९० च्या दशकातील दोन विद्यार्थी एक आद. दिगंबर सावंत आणि दूसरे संदीप परटवलकर सर दोघेही अभ्यासात किंबहुना शाळेतील हुशार विद्यार्थी, शाळेतील वकृत्व, लेखन स्पर्धा, मैदानी खेळ आणि परिक्षेतील पहि ल्या क्रमांकासाठी झटणारे.
- अव्वल विद्यार्थी, शाळेतील शिकवणीच्या तासाला सरांनी विचारलेल्या प्रश्नाला आपल्या अभ्यासू वाणीने उत्तर देण्यात सर्वांत आगोदर संदीप परटवलकर पुढे असत, तर कायम खेळात फिरण्यात वेळ घालवणारे दिगंबर सावंत वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत.
- दहावी नंतर दोघेही डी.एड करून उच्च शिक्षण घेऊन शि क्षक झाले संदीप परटवलकर डी.एड झाल्यावर शिक्षकी नोकरी मिळेपर्यंत त्यांनी घरची परिस्थिती हालाखीची अ सल्याने नोकरी निमित्त मुंबईत काकांच्या घरी आले.
- नोकरी मिळेपर्यंत मुंबईत १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे क्ला सेस सुरू केले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून रूजू झाले.
- बालपणीच सर्वगुणसंपन्न लाभलेल्या या विद्यार्थ्यांने शिक्ष क पदाला नवी दिशाच दिली, उच्च शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रातील अनेक आदर्श पुरस्कार प्राप्त केले.
- शिक्षणाबरोबर वकृत्व, स्पर्धा परीक्षा, मैदानी खेळ, सामा जिक बांधिलकी कशी जपावी असे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवत आहेत.
- शिक्षक हा विद्यार्थीच घडवतो असे नाही तर तो समाजही घडवतो हे ज्वलंत उदाहरण म्हणजे संदीप परटवलकर गुरूजी..!
- शाळेपुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील अनेक संघटनां मध्ये प्रबोधनात्मक, विकासात्मक आणि सामाजिक कार्यक्रम राबवून त्यांचं नेतृत्व करत आहेत.
- तालुक्यातील वारकरी संप्रदायांना एकत्रित करून समता, बंधुता आणि सम्यक जीवनशैलीचा पाया रचण्याचे कार्य संदीप परटवलकर गुरूजी करत आहेत.
- त्यामुळे लहानथोरांमध्ये “माऊली” या नावाने परिचित आहेत, संपुर्ण कुटुंब एकत्रित ठेवून बहिणींच्या मुलांनाही आपल्या जवळ ठेवून उच्च शिक्षित करून आज ते ही चां गल्या हुद्यावर कार्यरत आहेत आपल्या छोट्या बंधूला आ णि त्यांच्या मुलांचा चांगल्याप्रकारे सांभाळ करत आहेत.
- त्यामुळे ते संपूर्ण परिसरात एक आदर्श कुटुंब वत्सल म्हणू न ओळखले जातात अशा या सर्वगुणसंपन्न, समाज प्रबो धनकार, आदर्श शिक्षकांबद्दल येवढच म्हणावे लागेल, प्रि य गुरूवर्य माऊली संदीप परटवलकर गुरूजी सुवर्णमहो त्सवी वाढदिवस साजरा करणारे गुरुवर्य एक विद्यार्थी प्रि य आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात.
- बाबासाहेबांनी पेटवलेलेली संघर्षाची ज्वाला अखंड धगध गत रहावी. साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांची साधी, सरळ, स्वच्छ माणसे व्हावीत ही त्यांची तळमळ सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
- जवळेथर केंद्र प्रमुखपदी कार्यरत असलेल्या अशा उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या श्री संदीप परटवलकर गुरुजींना आमचा सलाम.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/