
समस्त कक्कय्या समाज महासंघाचे ८ जून रोजी दादर येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- समस्त कक्कय्या स माज महासंघ यांच्या २०२५ या रौप्य महोत्सवी वर्षाचे मंग लमय औचित्य साधून कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आणि सामाजिक मंडळाच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर चर्चा सत्राचे आयोजन दि. ८ जून २०२५ रोजी मुंबई त करण्यात आले आहे.
- यावेळी ढोर व कक्कया समाजाच्या सर्वांगीण विकासा साठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या संघटना / मंड ळे / संस्था / फाऊंडेशन इत्यादींच्या पदाधिका-यांना उप स्थित राहून चर्चा सत्रात भाग घेण्यासाठी विनंती करण्या त आली आहे.
- सदर कार्यक्रम रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी सका ळी १०.०० वाजता राजर्षि शाहू महाराज सभागृह, ३रा मजला, (छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहाच्या) न. चि. केळकर रोड, दादर (प), मुंबई-४०००२८, येथे करण्यात आले आहे.
- या चर्चा सत्रात पुढील विषयावर विचार मंथन करुन पुढी ल दिशा ठरविण्यात येणार आहे.
- १) २०२५ या मंगलमय रौप्य महोत्सवी वर्षाचा भव्य दिव्य सोहळा साजरा करणे.
- २) २०२५ ची मंगलमय रौप्य महोत्सवी “स्मरणिका ” काढणे.
- ३) २०२५ या मंगलमय रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त महा राष्ट्र, कर्नाटका, आंध्र, गुजराथ इ. राज्य व देश पातळी वरी ल कक्कय्या ढोर समाजाचे मुंबई येथे ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०२५ मध्ये भव्य दिव्य अधिवेशन घेणे.
- ४) संत शिरोमणी विरशैव कक्कया महाराजांचा पुर्णाकृती पुतळयासह भव्य स्मारक मुंबई येथे बांधून देणे.
- ५) तत्कालीन मा. मुख्यमंत्री, श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ या समाजासाठी देऊ अशी अधिवेशनात घोषणा केली होती.
- त्या घोषणेची अंमलबजावणी शासन निर्णय पारित करून अद्याप झालेली नाही. ती त्वरीत करण्यात यावी.
- ६) ढोर कक्कय्या समाजातील थोर स्वातंत्र सेनाने, हरिया णा व उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल आणि मुंबई प्रां ताचे मंत्री स्वर्गीय गणपतरावजी देवजी तपासे साहेब यांचे देशासाठी मौलीक योगदान असल्याने त्यांचे स्मारक शास नातर्फे उभारण्यात यावे.
- ७) देशाच्या पहिल्या हंगामी लोकसभेचे खासदार आणि नंतर सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले तसेच आमदार कै. मा.श्री.तायप्पा हरि सोनावणे हे ढोर कक्कय्या समाजाचे प्रतिनिधी होते.
- त्यांनी युनो मध्ये शासनाचे प्रि केले होते. अशा लोक नेत्या चे स्मारक शासनातर्फे उभारण्यात यावे.
- ८)माजी आमदार, लेखक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, साहित्यीक, चित्रपट कलाकार तसेच दलित मित्र पुरस्कारा ने गौरवण्यात आलेले स्वातंत्र सैनिक, समाज सुधारक, स्वर्गीय नामदेवरावजी व्हटकर.
- कै.नामदेवरावजी व्हटकर हे ढोर कक्कय्या समाजाचे लो कप्रिय नेते असून सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचे संपूर्ण चित्रीकरण त्यावेळचा अति शय विपरित काळामध्ये केले.
- यासाठी पैसा अडका नसल्याने स्वत:चा प्रिन्टींग प्रेस गहा ण ठेऊन कर्ज काढले व असे महान कार्य केले.
- ९) कै. मा. आमदार गणपतराव सोनवणे हे सलग सन १९५२ ते १९६७ असे ३ वेळेस आमदार होते.त्यांचे कार्य समाजासाठी मौल्यवान होते.
- या सर्वांचे स्मारक उभारून नव्या पिढीला याची जाणीव करुन देण्यासाठी, समाज पुन्हा एकत्रित आणण्यासाठी,
- आदी विषयावर चर्चा आणि विचार मंथन होणार असून यासाठी संत कक्कय्या समाजातील बांधवानी मोठया सं ख्यने उपस्थित राहून यात आपला सहभाग नोंदवावा.
- असे समस्त कक्कय्या महासंघ यांच्या वतीने अध्यक्ष श्री निवृत्ती सावळकर, कार्याध्यक्ष श्री मारुती सदाफुले, सरचि टणीस श्री प्रकाश दरवेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका त म्हटले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/