
वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयात शासन निर्णयाला केराची टोपरी…! अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त, शिस्तभंगाची कारवाई होणे गरजेचे
- प्रतिनिधी : वसई : नितीन राणे :- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी “पाच दिवसांचा आठवडा” लागू करण्याबाबत शासन निर्णय जाहीर केला होता.

- या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक २९ फेब्रुवारी २०२० पासून प्रभावी करण्यात आली असून सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यालयीन कामकाज होईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

- यासोबतच, दिनांक ०४ जून २०१९ रोजीच्या परिपत्रका नुसार, भोजनासाठी केवळ अर्धा तासाचीच विश्रांती देण्या त यावी, असा स्पष्ट आदेश आहे.
- परंतु वसई येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात या शा सन निर्णयांची सर्रासपणे पायमल्ली होत आहे.

- संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी दररो ज दुपारी २ ते ३.४० या दीर्घ कालावधीत भोजनासाठी अनुपस्थित राहत असून, कार्यालयात नागरिकांची लांबच लांब रांग लागलेली असते.

- परिणामी, गरजू नागरिकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागते. हे संपूर्ण प्रकरण शासनाच्या स्पष्ट आदेशांना न जु मानणारे आणि सामान्य जनतेच्या हक्कांवर अन्याय कर णारे आहे.

- शासन निर्णयाच्या विरोधात काम करणाऱ्या अशा मनमा नी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

- लोकशाही व्यवस्थेत शासकीय अधिकारी हे जनतेचे सेव क असतात. मात्र येथे नागरिकांना सेवा देण्याऐवजी त्यांची अवहेलना होत आहे.

- याबाबत संबंधित उच्च अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्या वी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई येथील गैर शिस्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











