
महिलांनी स्वयंरोजगाराकडे वळून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक – सिद्धी चाळके.
- प्रतिनिधी : गुहागर : प्रमोद तरळ :- महिलांनी स्वयंरोज गाराकडे वळून आर्थिक सक्षम होणे काळाची गरज अस ल्याचे प्रतिपादन सह्याद्री फाउंडेशनच्या प्रशिक्षक कु.सि ध्दी चाळके यांनी केले त्या पाली येथे घेण्यात आलेल्या महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या.
- शुक्रवार दि. ६ जून २०२५ रोजी सह्याद्री फाउंडेशन जाल गांव यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत पा ली येथे महिला कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले.

- सदर प्रशिक्षणात महिलाना अगरबत्ती साबण आणि मेण बत्ती बनवणे शिकवण्यात आले तसेच व्यवसाय भांडवल मार्केटिंग यावर मार्गदर्शन करण्यात आले.
- यादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी,सरपंच प्रतिष्ठित व्यक्ती यांचा सहभाग होता.सह्याद्री फाउंडेशन जालगांव ह्या सं स्थेचे प्रमुख अध्यक्ष श्री अजय पालकर उपस्थित होते.
- या संस्थेच्या प्रशिक्षक सिद्धी चाळके यांच्या मार्गदर्शनाखा ली हा कार्यक्रम पार पाडला. त्यांनी महिलांना असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या योग्य ते मार्गदर्शन केले.
- महिलांनी शारीरिक,मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे खूप गरजेचे आहे असं त्या म्हणाल्या सह्याद्री फाउंडे शन जालगांव दापोली या संस्थे मार्फत महिला कौशल्य विकास प्रशिक्षणा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
- गेले अनेक वर्ष ही संस्था महिला विकास आणि पर्यावरण क्रीडा शेती आरोग्य यांसारखे अनेक घटक केंद्रस्थानी ठेव त काम करत आहे.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत पा ली यांच्या वतीने संस्थेचे आभार मानले गेले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









