‘पणन संचालकांचं गुप्त वरदहस्त’ – खासगी बाजार समित्यांची बिनधास्त शेतकरी लूट….!

  • प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- साक्री तालुक्यातील काही खासगी बाजार व्यवस्थापनांकडून सर्रासपणे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असून,”एकूण खर्च” या नावाखाली प्रति क्विंटल ₹9.85 इतकी रक्कम बेकायदेशीररित्या वसूल केली जात आहे.
  • या शुल्काची ना पावती दिली जाते, ना शासकीय संमती आहे,ना विवरण दिलं जातं,तरीही पणन संचालक या प्रका राकडे डोळेझाक करत आहेत,ही अत्यंत गंभीर बाब आहे.
  • ‘एकूण खर्च’ म्हणजे नेमकं काय….?
  • शेतकरी माल विक्रीसाठी बाजारात येतात, तेव्हा खासगी बाजार व्यवस्थापन “एकूण खर्च” या नावाने त्यांच्याकडून पैसे वसूल करतं. मात्र,
  • १)या शुल्कामागचं विवरण नाही….?
  • २)कोणताही खर्चाचा तक्ता नाही….?
  • ३)ना हमालांना मोबदला दिला जातो…?
  • ४)ना ही रक्कम शासनाकडे भरली जाते….?
  • म्हणजेच हा आर्थिक गैरप्रकार असूनही प्रशासन गप्प आहे.
  • न्यायालयाचे आदेश झुगारले
  • मा.औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, परवाना धारक हमाल-मापाड्यांना कामात सामावून घेणे बंधनकारक आहे.
  • तरीही खासगी बाजार व्यवस्थापन यांनी या कामगारांना पूर्णतः बहिष्कृत केले आहे, आणि त्यांना कोणताही मोब दला दिला जात नाही. ही बाब कामगारांच्या हक्कावर घाला आहे.
  • पणन संचालक का गप्प….?
  • या बेकायदेशीर प्रकाराकडे पणन संचालक यांचं पूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे.
  • ते या व्यवस्थापनावर कोणतीही कारवाई करत नाहीत, उलटपक्षी त्यांच्या ‘मूक संमतीने’ ही लूट सुरू आहे का, असा गंभीर संशय उपस्थित होतो.
  • हर्षल ठाकरे यांचा थेट सवाल
  •  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) किसान सेलचे जिल्हाध्यक्ष हर्षल ठाकरे यांनी सांगितले की: “या बाजार व्यवस्थापना कडून शेतकरी व हमाल यांच्यावर अन्याय सुरू आहे.
  • पणन संचालक यांना सर्व गोष्टी माहित असूनही ते गप्प का आहेत…? ही भूमिकाच संशयास्पद आहे.
  • शासन परवानगीशिवाय शुल्क घेणे, हमालांना दूर ठेवणे – हे सर्व बेकायदेशीर असून या मागे कोणाचे आशीर्वाद आहेत हे तपासायला हवे.”
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा इशारा
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) किसान सेलच्यावतीने हर्ष ल ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर हे शोषण थांबवले गेले नाही, आणि प्रशासनाने कारवाई केली नाही, तर पक्षाकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, आणि दो षींवर थेट कारवाईची मागणी केली जाईल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles