निगडीतील मॉडर्न हायस्कुलमध्ये योगदिन उत्साहात साजरा.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथी ल मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन वि विध योग प्रात्यक्षिकासह साजरा करण्यात आला.
  • यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर,प्राचार्या शारदा साबळे,योग विद्याधाम पिंपरी चिंचवडचे योग अध्यापक चंद्रकांत वाले, मोनिका डोर्ले,निवेदिता कदम,कल्पना सुतार,मोनिका चौधरी आदी योग शिक्षक उपस्थित होते.
  • प्राचार्या शारदा साबळे म्हणाल्या,शारीरिक मानसिक स्वा स्थ जपण्यासाठी पतंजली ऋषींनी हजारो वर्षांपासून योग परंपरा निर्माण केली आहे.
  • ही योग परंपरा घरोघरी पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रय त्न केले पाहिजेत.
  • यावेळी चंद्रकांत वाले म्हणाले,भारताची नवीन युवा पिढी सुदृढ,निरोगी राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित योगा करणे गरजेचे आहे.
  • यामुळेच भारत एक बलशाली राष्ट्र होऊ शकेल. योगामुळे मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होऊन मना ची एकाग्रता वाढते असे ते म्हणाले.
  • कार्यक्रमाचे नियोजन गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके ,खंडू खेडकर यांनी केले.
  • उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डॉ.प्रा.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,पर्यवेक्षक विजय पाचारणे,संस्था सदस्य राजीव कुटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles