
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे – ०५ संचालित मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर येथे जागतिक योगदिन साजरा.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- मॉडर्न शैक्षणिक संकुला च्या मैदानावर ११ वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा कर ण्यात आला.
- याप्रसंगी योग विद्याधाम पिंपरी चिंचवड चे योगशिक्षक श्री.बबन शिंदे, सौ.जयश्री पुरोहित,सौ.मनीषा पवार, सौ.सु वर्णा जाधव व श्री. पांडुरंग मराडे इत्यादी मान्यवर उपस्थि त होते.

- इयत्ता ४ थी मधील विद्यार्थिनी कु. अरमिता गलगले हिने योगदिनाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कैलास माळी यांनी केले.
- सौ.जयश्री पुरोहित यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आयु ष्यात योगसाधनेचे काय महत्त्व असते याविषयी मार्गदर्शन केले.

- द्विजसेवितशाखस्य श्रुतिकल्पतरो : फलम् l
- शमनं भवतापस्य योगं भजत सत्तम : ll
- वेद हे कल्पतरू आहेत व ज्याप्रमाणे वृक्षाच्या फांद्यांचा व फळाचा आस्वाद पक्षी घेतात, त्यांना आपले आश्रयस्थान बनवतात.
- त्याचप्रमाणे वेद या कल्पतरूचे योग हे फळ आहे त्याच्या आस्वादाने शारीरिक व मानसिक पुष्टतेचा अनुभव येतो व जीवन सुखी आणि समाधानी होते.

- योगशिक्षिका सौ.मनीषा पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जर थोडासा वेळ आपण योग साधनेसाठी राखून ठेवला तर उर्वरित आयुष्यात निश्चितच अमूलाग्र बदल दिसून येईल.
- शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. माणसाच्या आयुष्यसागरात प्रचंड लाटा उठविणाऱ्या द्वेष, ईर्षा, क्रोध, काम, मोह यांचा विमोड करण्याची ताकद फक्त योगसाध नेतच आहे.

- आपण स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाचे, समाजाचे पर्या याने देशाचे हित इच्छित असाल तर एक समजून घ्या की योगसाधना एक प्राचीन शास्त्र आहे व त्याचा अंगिकार सर्वांनी करावा.
- योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवनात स्थान द्या व ब घा आपल्या आयुष्यात त्या क्षणापासून सुपरिणाम दिसून येईल.
- ‘ज्याचं आरोग्य चांगलं असेल, तोच आनंदी राहील, आणि भविष्याची स्वप्ने तो,उघड्या डोळ्यांनी पाहिल.’
- यावेळी विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार त्यांना करता येतील अशी प्राणायाम, सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पद्मास न, भुजंगासन, वज्रासन, त्रिकोणासन इत्यादी योगासन प्र कारांचे प्रात्यक्षिके करून योगासने करून घेण्यात आली.
- श्री.किरण वारके, श्री.नरेश कांबळे, रोहिणी माने, भारती साळुंखे या शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.

- कार्यक्रमाचा शेवट संस्कृतश्लोक म्हणून करण्यात आला.
- ‘ॐ सर्वे भवन्तु सुखिन: l सर्वे संतु निरामया:ll
- सर्वे भद्राणि पश्यन्तु माकश्चिद्द्दु:ख भाग्भवेत् ll
- ओम शांती शांती शांती
- संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.श्री.गजानन एकबोटे, कार्यवा ह मा.श्री.शामकांत देशमुख, सहकार्यवाह मा.सौ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे, शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.मानसिंग साळुंके, व्हिजिटर मा.श्री.प्रमोद शिंदे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योगदि नाच्या शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











