
पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश वाघमारे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना 14000 रुपये किमतीची पाठ्यपुस्तके वाटप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा ये थील एकूण अठारा गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील अभियां त्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश वाघमारे यांनी आर्थिक अडचणीमुळे पाठ्यपुस्तक घेऊ न शकणार्या दोन्ही प्रशालेच्या एकूण 18 मुलां मुलींना 14 हजार रुपये किमतीची इयत्ता 9 वी व 10 ची पाठय़पुस्तक संच वाटप केले.

- पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभि यान अंतर्गत शासनाकडून मोफत पाठय़पुस्तके दिली जा तात परंतु 9 वी 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतः पाठ्य पुस्तक घ्यावी लागतात.

- समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून प्राध्यापक अविनाश वाघमारे दरवर्षी दो न्ही प्रशालेच्या होतकरू मुलांना मदत करत आहेत.
- प्राध्यापक अविनाश वाघमारे हे परंडा येथील रहिवासी अ सून जिल्हा परिषद प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत.

- पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमासाठी त्यांच्या आई.सौ. कम ल विश्वनाथ वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
- शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले यावेळी मुलांच्या प्र शालेचे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र इंगळे, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.दिनकर पवार, माध्यमिक शिक्षक श्री सतीश खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
- यावेळी शुभांगी देशमुख साबिया तांबोळी मीनाक्षी मुंढे यां च्यासह दोन्ही प्रशालेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

- वाघमारे कुटुंबाचे दोन्ही प्रशालेच्या पालक विद्यार्थी शिक्ष क यांनी आभार व्यक्त केले आहेत त्यांच्या या उपक्रमाची समाजातील सर्व स्तरामधून प्रशंसा होत आहे.
- सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सुर्यवंशी यां नी केले सूत्रसंचालन आबासाहेब माळी तसेच आभार प्र दर्शन नामदेव पखाले यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











