
ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ,नालासोपारा मोरेगाव ( रजि.) तर्फे भव्य दिव्य दिंडी सोहळा संपन्न.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-ओम गुरुदेव रेल्वे प्रवा सी भजन मंडळ, नालासोपारा मोरेगाव ( रजि.) तर्फे भव्य दिव्य दिंडी सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवारी ( ६ जून ) रोजी अत्यंत भक्तिभावाने,हरिनामाच्या गजरात आ णि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपन्न झाला.
- सकाळी ८:४० विरार लोकलमध्ये पूजन करून हरिनामा चा गजरात दिंडीला शुभारंभ करण्यात आला.

- दिंडीने भक्तिरसात चिंब होऊन चर्चगेट स्टेशन गाठले. संत सेवा समितीचे कार्यकारी पदाधिकारी यांनी प्रेमपूर्वक स्वागत केले.
- तिथे जणू काही प्रतीक पंढरपूरच उतरले होते,असा आनं दमय सोहळा सर्व भाविकांनी अनुभवला. दुपारी १२ वा. दहिसर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले.
- यावेळी मंदिर समितीनेही भव्य स्वागत केले. रिंगणात भ क्तिमय गजर, टाळ- मृदुंगाचा गगनभेदी निनाद, भजनांचे सुमधुर सूर आणि भक्तांची एकरूपता या साऱ्या वातावर णात दिंडी न्हालेली होती.
- शेवटी शिवमंदिर, मोरेगाव येथे भजन गजरात दिंडीची भव्य सांगता कार्यक्रम पार पडला. या पवित्र सोहळ्यात कार्याध्यक्ष श्री.सुनील कदम,अध्यक्ष गणेश पवार,सेक्रेटरी शैलेश मोडक,खजिनदार अंकुश सावंत,दिंडी प्रमुख – शर द जाधव, तुकाराम सावंत, दिपक सावंत, शंकर नेवगे, मले श जाधव, निलेश खरपुडे, दिपक पाटील, जनार्दन, अजय, नवनाथ बाईंग,आनंदा मत्रे आदीं पदाधिकारी,सदस्य आणि सभासद, हितचिंतक उपस्थित होते.
- या सर्वांनी आप-आपली जबाबदारी उत्तमरित्या बजावली. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती मंडळाचे आधारस्तंभ धनाजी जाधव,मोरेश्वर विद्यालय संस्थापक – पंढरीनाथ पाटील, अॅड. वैभव पाटील,आशिष दळवी – ( ट्रेन मॅनेजर चर्चगेट ) यांची लाभली.

- सेक्रेटरी- श्री शिवजयंती उत्सव मंडळ आणि आषाढी एकादशी उत्सव मंडळ,तसेच सर्व सभासद आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्वांनी एकत्र येऊन हा भक्तिमय सोहळा अत्यंत शिस्तब द्ध आणि प्रेमाने पार पाडला.खरंतर ही दिंडी नव्हे तर भ क्तीचा महापूर होता अशी प्रचिती आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











