
“विरार वाहतूक शाखेतील तीन टोईंग वाहन गोडाऊनचे चार वर्षांचे रजिस्टर गायब ?? चौकशी करून गुन्हा नोंदवण्याची मागणी”
- प्रतिनिधी : अनंत पाटील :- विरार (पश्चिम) येथील वाह तूक नियंत्रण शाखा क्र. ३ अंतर्गत कार्यरत असलेल्या ती न टोईंग वाहन गोडाऊनमधील 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील सर्व नोंदींची रजिस्टर पुस्तके गुपचूपपणे नष्ट करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार अनंत पुंडलिक पाटील यांनी केला आहे.
- त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तांना सविस्तर निवेदनाद्वारे विभागीय चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

- अनंत पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केलेल्या अर्जावर प्रथम अपिलीय अधिकारी यांनी 23 एप्रिल 2025 रोजी स्पष्ट आदेश दिला होता की, 1 जानेवारी 2021 पासूनच्या सर्व नोंदींचे प्रत्यक्ष अवलोकन करून देण्यात यावे.
- या आदेशाच्या अनुषंगाने पाटील 11 जुलै 2025 रोजी वा हतूक शाखा कार्यालयात उपस्थित राहिले. मात्र त्यांना फ क्त 1 जानेवारी 2025 नंतरचीच रजिस्टर पुस्तके दाखव ण्यात आली.
- मागवलेली 2021 ते 2024 या तीन वर्षांतील सर्व महत्त्वा ची अभिलेख नोंदी कुठे आहेत, याचा कोणताही ठोस पुरा वा किंवा दस्तऐवज अधिकाऱ्यांकडे नव्हता.
- उलट अशा नोंदी अस्तित्वातच नाहीत, असे तोंडी सांगून दिशाभूल करण्यात आली. ही रजिस्टर फक्त एका गोडावू नपुरती मर्यादित नसून, एकाच शाखेअंतर्गत काम करणा ऱ्या तीन टोईंग गोडावूनमधील एकूण नोंदींचा समावेश यात होता.
- त्यामुळे ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून, रेकॉर्ड नष्ट करून माहिती अधिकारात मागवलेली माहिती लपव ण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
- या प्रकाराचा व्हिडिओ पुरावा पाटील यांनी स्वतः तयार केला असून, तो पोलीस आयुक्तालयास सादर करण्याची तयारीही दर्शवली आहे.
- या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, सदर रजिस्टर कोणी, कधी, व कुणाच्या परवानगीने नष्ट केली यासंदर्भा त कोणतेही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नाहीत.
- त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख जतन अधिनियम, 2005 चे सरळसरळ उल्लंघन झाले आहे.
- याशिवाय, न्यायालयीन किंवा प्रशासकीय चौकशीसाठी आवश्यक असणारे दस्तऐवज गहाळ होणे ही व्यवस्था आणि कायद्याच्या राज्याला दिलेली गालबोट आहे.
- अनंत पाटील यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे पाच मा गण्या मांडल्या आहेत. 2021 ते 2024 पर्यंतच्या गोडावू न रजिस्टर जाणीवपूर्वक नष्ट करणाऱ्या किंवा लपवणा ऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ विभागीय चौक शी सुरू करावी.
- सदर नोंदी नेमक्या का आणि कोणाच्या आदेशाने नष्ट क रण्यात आल्या याची स्वतंत्र आणि सखोल चौकशी कर ण्यात यावी.
- या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल तयार करून, महारा ष्ट्र सार्वजनिक अभिलेख जतन अधिनियम 2005 व भार तीय न्याय संहिता 2023 अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस विभागाकडे प्रस्ता व सादर करण्यात यावा.
- तसेच जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणी झाले ल्या कार्यवाहीबाबत लेखी अहवाल अथवा आदेशाची अधिकृत प्रत पुरवण्यात यावी.
- या प्रकारामुळे शासकीय अभिलेखन, माहिती अधिकारा ची अंमलबजावणी, आणि नागरिकांचा विश्वास या सर्व बाबींवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून.
- सदर प्रकाराला रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






