
वडगाव पोलिसांनी वाहनासह तीन लाखाचा गुटखा केला जप्त; कोळंबी फाट्यावर गाडी तपासणी करताना आढळला गुटखा.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- घाटंजीकडून यवतमाळकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या व्यागनर वाहनातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतुक करीत असतांना वडगाव पोलिसांनी कोळंबी फाट्यावर रोखून वाहनासाह तीन लाख रुपयाचा गुटखा पकडला.
- अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपीविरुद्ध वडगाव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाख ल करण्यात आला.

- मंगळवारी रात्री वडगाव पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना कोळंबी फाट्यावर एक पांढऱ्या रंगाचे व्यागणार वाहन क्र. एम एच २० बी सी ०८४६ हे घाटंजीकडून यवतमाकडे जात असतांना संशयावरून थांबवले.
- सदर वाहनात प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा ) असलेले आढळून आले. ठाणेदार विकास दांडे यांनी अन्न व औषध प्रशासनाला या बाबत माहिती दिली.
- १२जुलै २०२४ च्या अधिसूचनेनुसार साठा,वाहतूक,विक्री, उत्पादन साठी प्रतिबंधित करण्यात आलेले लक्झरी तंबा खू ,पानमसाला, सुगंधित तंबाखू, जाफरानी जर्दा असा ए कुण एक लाख चौर्यान्नव हजार चारशे सतरा रुपयाचा मुद्दे माल व एक लाख रुपयाचे वाहन जप्त करून अन्न सुरक्षा अधिकारी एस.आर.सुरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश सुरेश वाघाडे, रा.इंदिरा नगर यवतमाळ, आ लोक महेश यादव रा.यवतमाळ यांचें विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- यासंह वडगाव पोलिसांनी रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर प कडुन त्यांच्यावर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे, तर अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यावर धाड टाकुन कारवाई केली आहे.
- महसूल विभागानेही रेती तस्करी करणाऱ्यावर कारवाई करून जरब बसवीला आहे.अकोला बाजार परिसरातही अवैध धंदे फोफावले आहे.
- गुटखा विक्रीचे तर अकोला बाजार हे केंद्रच बनले आहे. येथुन परिसरात मोठया प्रमाणात गुटखा, सुगंधित तंबाखू ची विक्री होते.
- शाळेतील विद्यार्थ्याना सहजच गुटखा उपलब्ध होत अस ल्याने शालेय विद्यार्थ्यांना तंबाकूचे व्यसन लागत आहे. या वर सुद्धा वडगाव पोलिसांनी वचक बसवावा अशी माग णी होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






