
येवती येथे महसुल सप्ताह अंतर्गत घरकुल पट्टे वाटप ; आमदार बाळासाहेब मांगुळकर, विभागीय अधिकारी देशपांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :-यवतमाळ तालुक्यातील येव ती येथे शासनाने राबविलेल्या महसुल सप्ताह अंतर्गत गरजू असलेल्या अतिक्रमण धारक लाभार्थ्यांना शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी पट्टे वाटप करण्यात आले.
- येवती ग्राम पंचायत येथे महसुल सप्ताह आयोजित करून गेल्या दहा ते पंधरा वीस वर्षापासुन घरकुल लाभार्थी पट्टे करिता च्या मागणीला ग्राम पंचायतच्या विशेष पाठपुरा व्यामुळे आणि प्रशासकीय मान्यतेमुळे या अतिक्रमण धार कांना पट्टे मिळाल्याने त्यांच्या घरकुलाचा मार्ग सुलभ झाला.

- यामुळे लाभार्थीना लवकरच घरकुलाचा हप्ता जमा होणा र आहे.
- या कार्यक्रम प्रसंगी आमदार बाळासाहेब मांगुळकर,विभा गीय अधिकारी देशपांडे, गटविकास अधिकारी मडावी, त हसीलदार डॉ.योगेश देशमुख, मंडळ अधिकारी प्रीतम गो डे, विस्तार अधिकारी भोयर, ग्राम पंचायत सरपंच कांता भगत, उपसरपंच बाळू जाधव, ग्राम पंचायत सर्व सदस्य ,अकोला बाजार ग्राम महसूल अधिकारी आकाश जगता प, येवती ग्राम महसुल अधिकारी गजभिये मॅडम, कृषी सहायक देवकते मॅडम, पोलिस पाटील रंजीत गौरकार, रमेश भिसनकार आदी उपस्थित होते.

- यावेळी एकूण पंधरा लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आ ले असून विठ्ठल बोबडे, अशोक नाईकवाडे, संतोष नाईक वाडे, विश्वनाथ खरतडे, गणेश आडे, रेणुका खडसे, विठ्ठल मूर्खे, भिमराव टेकाम, वासुदेव टेकाम, दुर्गा जाधव, मिरा बाई कोयरे, मोहन जाधव, हिरुबाई राठोड, तोताबाई जाध व या पात्र घरकुल लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले.
- येवती ग्राम पंचायत स्वच्छता आणि नागरिकांच्या प्रश्न सो डविण्यासाठी तत्पर असल्याचे अधोरेखित करत आमदार मांगुळकर यांनी कौतुक केले.

- तर विभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी शासनाच्या योजना विषयी मार्गदर्शन केले.
- कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक रामेश्वर गौरकार यांनी केले तर आभार देवकते मॅडम यांनी मानले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











