
पिंपरी चिंचवडमध्ये जिजामाता सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- निगडी क्रीडा- भारती पिं परी चिंचवड आणि पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता सन्मान व जीवन गौरव पुरस्कार सोहळा रवि वारी ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथील मनोहर सभागृहात उ त्साहात पार पडला.
- या सोहळ्यात रुस्तम-ए-हिंद महाराष्ट्र केसरी पैलवान अ मोल बुचडे यांच्या मातोश्री रंजना प्रभाकर बुचडे यांना जि जामाता सन्मान पुरस्कार तर क्रीडा भारतीचे सदस्य गोविं द टिपरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्या त आले.

- यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय क्रीडा भार तीचे महामंत्री श्री राजजी चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, अखिल भारतीय क्रीडा भारती कोषाध्य क्ष मिलिंद डांगे,पश्चिम महाराष्ट्र क्रीडा भारती अध्यक्ष विज य पुरंदरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शेखर कुलकर्णी ,प्रांत कार्यकारिणी सदस्य राजेंद्र महाजन, अखिल भारतीय सद स्य डॉ सतीश बोरकर,पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान सोनव णे यांच्यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय खे ळाडू, क्रीडा प्रशिक्षक आणि कुटुंबीय उपस्थित होते.
- यावेळी राज जी चौधरी म्हणाले की, खेळामुळे शिस्त, संघ भावना व चिकाटीची जडणघडण होते.
- यावेळी अमोल बुचडे यांनी आपल्या मनोगतात कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत क्रीडा भारती या संस्थे ने आईला जिजामाता सन्मान पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
- “मोबाईलपासून दूर राहून एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो, घ रातील मोठ्यांकडून व्यायामाची प्रेरणा घेतली म्हणून आ ज मी घडलो,” असे ते म्हणाले.
- जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी आपल्या म नोगतात सांगितले की, क्रीडा भारतीचे कार्य अतिशय स्तु त्य असून त्यांचे योगदान प्रशंसनीय आहे.
- आजच्या पुरस्कार सोहळ्यामुळे खेळाडू आणि त्यांच्या कु टुंबियांना मोठी प्रेरणा मिळेल. खेळाडू व मातांचा सन्मान पाहून उर भरून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
- क्रीडा भारतीचे कार्य संपूर्ण देशाला उत्तम आरोग्य देण्या साठी महत्त्वपूर्ण असून समाजाकडे लक्ष वेधणारी संस्था म्हणून ती कार्यरत आहे.
- खेळाद्वारे शक्ती,बुद्धी आणि मनाचा विकास घडतो,असेही त्यांनी सांगितले.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव जाधव व प्रास्ताविक दिनेश कुलकर्णी यांनी केले तर आभार माधवी इनामदार यांनी मानले.
- पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे यांनी सर्व खेळाडू माता व अतिथींचे स्वागत केले. यशस्वी खेळाडू व त्यांच्या मातांच्या नावांच्या यादीचे वाचन राजेंद्र महाजन यांनी केले.
- या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा भारती सदस्य, जग दीश सोनवणे, श्री व सौ शीतल सुहास म्हात्रे, श्री व सौ सो नाली उल्हास मापुसकर,श्री व सौ योगिनी संतोष पाचारने, विवेक नाणेकर, एकनाथ भालेकर, अंबरीश नरगट्टी,राजू जाधव सचिन ववले, सचिन बचुटे, राजू गमरे, रंजना डांगे ,वर्षा चराटे यांनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











