अट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी राजकुमार जैन यांना तात्काळ अटक करा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारुक शेख :- परंडा अट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या राजकुमार जैन यांना तात्काळ अटक करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तंतोतंत पालन करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या व तीने तहसीलदार निलेश काकडे व पोलीस निरीक्षक आ साराम चोरमले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
  • राजकुमार जैन यांना अटक न केल्यास लहुजी शक्ती सेने च्या वतीने परंडा शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना देण्यात आलेल्या नि वेदनात म्हटले आहे की, दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी मौजे कपिलापुरी येथे मातंग समाजाच्या शिंदे नामक कुटुं बावर गावातील गावगुंडाने जातीय भावनेतून हल्ला करू न महिला, पुरुष, लहान बालके यांना जबर मारहाण केली होती.
  • या अनुषंगाने पोलीस ठाणे परंडा येथे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच विविध कलमानुसार गावगुंडांवर गुन्हा दाखल झालेला होता.
  • या प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार जैन याने बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून अटकपूर्व जा मीन मंजूर करून घेतला होता.
  • मात्र दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी खंडपीठाने दिलेला अटकपूर्व जामीन रद्द करून आरोपी विरुद्ध एससी एसटी अत्याचार कायद्यान्वये गुन्हा सिद्ध होतो असे स्पष्ट शब्दात नमूद केलेले आहे.
  • तरी देखील संबंधित प्रकरणातील आरोपी राजकुमार जैन राजरोसपणे मोकाट फिरत आहे. भारताच्या सर्वोच्च न्या यालयाच्या आदेशाला संबंधित पोलीस प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.
  • ही बाब दुर्दैवी असल्याचे म्हणावे लागत आहे. हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आहे.
  • आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी तहसीलदार व परंडा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस उपविभागीय अ धिकारी भूम यांना निवेदन पाठवून अशी मागणी करतो की, संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी व भारता च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तत्काळ अं मलबजावणी करून आम्हा पिडीतांना न्याय द्यावा.
  • आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने परंडा शहरांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा पोलीस प्रशासनाला देण्यात आलेला आहे.
  • निवेदनावरती लहुजी सेना महिला आघाडीच्या तालुकाध्य क्ष राजश्री चव्हाण, धाराशिव कोर कमिटीचे अध्यक्ष गणेश शिंदे, लहुजी सेनेचे युवक तालुकाध्यक्ष धनंजय आडगळे, शहराध्यक्ष सुनील दणाने, माजी पंचायत समिती सदस्य गुलाब विदि,सामाजिक कार्यकर्ते पुवराज कसबे, सामाजि क कार्यकर्ते विनोद बोरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles