
लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे श्री. गणेश कोर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने योगदान देणारे तसेच नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अव लंब करून ग्रामीण भागातील मुलांमध्ये शैक्षणिक तसेच सामाजिक जाणीवा निर्माण करणारे श्री.गणेश अशोक कोर यांना यंदाचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार लायन्स क्लब ऑ फ सफाळे तर्फे प्रदान करण्यात आला.
- श्री.गणेश कोर हे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्या तील अंबासन गावचे रहिवासी असून सध्या राजमाता जि जाऊ विकास प्रबोधन संस्था,जव्हार संचलित छत्रपती शि वाजी विद्यानिकेतन, खोच, तालुका जव्हार, जिल्हा पालघ र येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

- त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण पोहो चविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून शैक्षणिक द र्जा उंचावण्यासाठी त्यांचा हातभार महत्त्वपूर्ण ठरला आहे.
- त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा व रा ज्यस्तरीय शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.
- विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यां च्यात सामाजिक बांधिलकी, सृजनशीलता व चारित्र्यनिर्मि ती घडविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय आहे.
- त्यामुळे परिसरातील शैक्षणिक वातावरण अधिक बहरले असून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आदर्श व प्रेरणादायी नाते संबंध निर्माण झाला आहे.
- हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि.१३ सप्टें बर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता, देवभूमी सभागृह, सफाळे येथे पार पडला.
- लायन्स जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व लायन्स गौरव सन्मान २०२५ हा कार्यक्रम आदर्श शिक्षिका स्व. प्र णिता पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व सामाजिक कार्यकर्ते श्री.पांडुरंग झु-या वर्तक यांच्या सौजन्याने आयोजित कर ण्यात आला होता.
- कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मा.लायन मनोज म्हात्रे, प्रेसिडेंट – लायन्स क्लब ऑफ सफाळे.
- प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय कवी, गीतकार व निवेदक मा.श्री.अरुण म्हात्रे उपस्थित होते.
- विशिष्ट अतिथी म्हणून मा.लायन नटवर बंका (फर्स्ट व्हा ईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), मा.लायन मनमोहन गुप्ता (प्रसिद्ध फिल्म निर्माता, दिग्दर्शक व चेअरपर्सन – इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन) आणि मा.लायन प्रमोद पाटील (झोन चेअरपर्सन) हे मान्यवर उपस्थित राहिले होते.
- आयोजनात लायन जतिन कदम (सेक्रेटरी), लायन कुंदन राऊत (ट्रेझरर) व लायन सचिन वर्तक (फर्स्ट व्हाईस प्रेसि डेंट) यांनी विशेष परिश्रम घेतले.
- विशेष म्हणजे हा सन्माननीय पुरस्कार श्री.गणेश कोर यां नी आपल्या जिवलग मित्र व शाळेचे मुख्याध्यापक कै. श्री.केतनकुमार शेवाळे यांना समर्पित केला.
- त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सन्मान अधिक अर्थपूर्ण ठरला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात लायन्स क्लब ऑफ सफाळे तसेच मान्यवरांनी श्री.गणेश कोर यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- या सन्मानामुळे संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक, मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी तसेच अंबासनसह खोच परिसरातील गावकऱ्यांमध्ये अभिमान व आनंदाचे वाता वरण आहे.
- या पुरस्काराने केवळ श्री.कोर यांचा गौरव झाला नसून ग्रा मीण व आदिवासी भागात कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पण व कष्टाचीही दखल घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











