
पेंडखळे चिपटेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार; लागोपाठ हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पेंड खळे चिपटेवाडीत वाघांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त रुणाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा चिपटेवाडीती ल शेतकऱ्याच्या दोन वर्षांच्या पाडयाला बिबट्याने ठार केले आहे.
- चिपटेवाडीतील शेतकरी श्री जितेन्द्र खानविलकर यांचा २ वर्षांचा पाडा रानात चरण्यासाठी गेला असता बिबट्याने हल्ला करुन त्याला ठार केले आहे.

- बिबट्याकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे पेंडखळे व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून दिवसाही घराबाहेर पडण्यास धजावत आहेत.
- वनविभागाने सातत्याने हल्ले करणाऱ्या या हिंस्त्र प्राण्यां चा बंदोबस्त करावा आणि श्री खानविलकर यांना नुकसा न भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











