पैठणमध्ये 3000 कुटुंबांचा निवारा हिरावला : नाथ महाराज मंदिरास 12 तास पाण्याचा वेढा, शहरासह परिसरात 6 गावांतील 5 हजार घरांमध्ये पुराचे शिरले पाणी.

  • प्रतिनिधी : संदीप कारके :- जायकवाडी धरणातून रवि वारी सलग ३ लाख ६ हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदी च्या पात्रात पाणी सोडल्याने पैठण शहरातील कहारवाडा, संतनगर, परदेशीपुरा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पो लिस ठाण्यासह ३ हजार घरांमध्ये पाणी शिरले. ग्रामीण भागातील नायगाव, मायगावसह परिसरातील ६ गावांतील ५ हजार घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.
  • त्यामुळे रविवारी सकाळी जायकवाडीचा विसर्ग २ लाखा पर्यंत कमी करण्यात आल्याने पूर ओसरला. मात्र, शहरा तील अनेक रहिवाशांचे संसार उद्ध्वस्त झाले.
  • घरात साचलेला चिखल काढताना महिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. रविवारची रात्र आम्ही जागून काढली असे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सांगितले.
  • नाथ मंदिराला १२ तास पाण्याचा वेढा पडला होता. जाय कवाडीच्या विसर्गामुळे आलेल्या पुरातून वाचलेल्या नाग रिकांना आजा जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
  • काही जणांच्या घरातील अन्नधान्य पुरात वाहू गेले, कोणा चे घर पडले, कित्येकांचे व्यवसाय पाण्यात बुडाले आहेत.
  • त्यामुळे या पूरग्रस्तांना आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. पूर ओसरल्यानंतर शहरात अनेक भागां मध्ये केरकचरा साचला आहे.
  • पैठण शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबा साहेब आंबेडकर पुतळापर्यंत मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले.
  • रविवारी दुकानांमधून पाणी ओसरले मात्र दुकानांमध्ये प्रचंड गाळ साचल्याने दुकानदारांना स्वच्छतेसाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत.
  • भाविकांचा पूजापाठाचा नित्यक्रम चुकला संत एकनाथ महाराज मंदिर पाण्याखाली गेले होते रविवारी सकाळी या ठिकाणचे पाणी ओसरले.
  • सकाळी ११ वाजेनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. पाणी ओसरल्यानंतर मंदिरात स्वच्छता करून पूजा व आ रती असा नित्यक्रम सुरु झाला.
  • त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आ ले. पुरामुळे अनेक भाविकांचा पुजेचा नित्यक्रम सोमवारी सकाळी चुकला. पूरग्रस्तांनी रस्त्यावर मांडला संसार, अ द्याप मदत नाही.
  • शहरातील तीन हजार घरात पुराचे पाणी शिरले मात्र अद्या प कोणत्याही प्रकारची मदत कोणालाच मिळाली नसल्या ने कहारवाडा येथील बजरंग लिंबोरे यांनी सांगितले.
  • कहारवाडा, संत नगर या भागातील गरीबांना अद्याप का ही मदत मिळाली नाही, केवळ मंदिरात निवारा मिळाला मात्र अन्न चा प्रश्न या भागातील अनेक कुटुंबा समोर आता निर्माण झाला आहे.
  • गोदावरी नदीच्या काठावरील नायगाव व मायगाव यासह गोदावरीच्या काठावरील गावात पुराचे पाणी शिरल्याने पूरग्रस्तांनी रस्त्यावर संसार मांडला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles