करिअर विजय समुपदेशन – प्रशिक्षण केंद्राचे चिखली येथे उद्घाटन.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- चिखली येथील मोरया अकॅडमी मध्ये करिअर विजय या करिअर सल्ला मार्गदर्श नपर समुपदेशन केंद्राचे तसेच विविध कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले.
  • सुप्रसिद्ध करिअर तज्ञ विजय नवले, मोरया अकॅडमीचे सं चालक प्रा.नितीन साळी, संदीप पोलकम सर (संस्थापक Dolphin Pre school),गौतम इंगळे (मुख्याध्यापक दा दा महाराज नाटेकर गुरुकुल),शिवाजी अंबिके,संदेश मुखे डकर (संचालक स्टेप्स अकॅडमी) नीलम मॅडम (संचालक गुरुकुल IAS सेंटर),आण्णासाहेब लावंड सर (संचालक विकास इन्फोटेक चिखली),अश्विन गुडसुरकर,संदेश वाघु ले आदी मान्यवर या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
  • विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या समस्या, पालकत्व, करिअरची निवड, करिअरची पायाभरणी, संवाद कौशल्य ,उद्योजक ता अशा विविध विषयांवरील समस्यांसाठी हे वैयक्तिक समुपदेशन केंद्र चिखली येथे सुरू करण्यात आले आहे.
  • या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थीपालक,गृहिणी नोकरदा रवर्ग,उद्योजक,सामाजिक राजकीय कार्यकर्ते आदींना संबंधित विषयांवर समुपदेशन करता येणार आहे.
  • त्याचबरोबर वक्ता प्रशिक्षण,संभाषण कौशल्य, स्टार्टअप व्यवसाय, निवृत्तीनंतरचे करिअर, करिअरच्या निवडीची प्रक्रिया अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम देखील घेतले जाणार आहेत.
  • प्रा विजय नवले यांच्या समुपदेशन आणि मार्गदर्शन क्षेत्रा तील पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना होणार आहे.
  • हे केंद्र प्रा.नवले संचलित करिअर विजय आणि प्रा.नितीन साळी संचलित मोरया अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चालू करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अशाच पद्धतीचे केंद्र चा लू करून परिसरातील विद्यार्थ्यांना करिअर तसेच अभ्यास विषयातील मार्गदर्शन या निमित्ताने होणार आहे.
  • चिखली येथील ही शाखा महाराष्ट्रातील पहिली शाखा म्हणून घोषित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयो जन प्रा.नितीन साळी यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles