
दळे परिसरातील भात शेतीवर करपा रोग….! नुकसान भरपाईची स्वप्निल सोगम यांची आ.भैय्या सामंत यांच्याकडे मागणी.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील दळे परिसरात भात शेतीवर करपा रोग पडल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशा विचाराने शे तकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
- आधीच प्रचंड प्रमाणात पडत असलेल्या पावसाने शेतक ऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले असताना आता करपा रोग पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
- शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया जाणार आहे या विचाराने शेतकरी वर्गाची झोप उडाली आहे.

- तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शे तीच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत तशा सूचना आम दार महोदयांनी तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधि काऱ्यांना द्याव्यात शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळावी.
- अशी मागणी दळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी स्वप्निल सोगम यांनी आमदार श्री सामंत यांना दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
- सदरचे निवेदन आमदार श्री किरण उर्फ भैय्या सामंत यां ना रत्नागिरी शासकीय विश्रामभाम येथे गिरीश करगुटकर यांनी सादर केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











