
“सत्तेपेक्षा सेवा…! दिनेश मांगले यांचा ऐतिहासिक निर्णय”
- प्रतिनिधी : परांडा : फारूक शेख :- परंडा तालुक्याती ल शेळगाव सर्कलमध्ये काल राजकारणाच्या रंगमंचावर एक असा निर्णय घडला, की ज्याने प्रत्येक कार्यकर्त्याचे, मतदाराचे आणि सामान्य जनतेचे मन भारावून गेले.
- जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरु ष घोषित झाल्यानंतर सर्वांचं लक्ष एकाच नावाकडे लागलं होतं – जनतेचा विश्वासू चेहरा दिनेश रोहिदास मांगले.
- परंतु सर्वांना धक्का देणारा आणि त्याचवेळी अंतःकरण पिळवटून टाकणारा निर्णय दिनेश मांगले यांनी जाहीर के ला – ते आगामी निवडणूक लढवणार नाहीत…!

- गेल्या अनेक वर्षांपासून घराणेशाहीच्या राजकारणामुळे लोक वैफल्यग्रस्त झाले होते. त्यातूनच दिनेश मांगले हे लोकांसाठी नवा किरण, नवा पर्याय म्हणून समोर आले.
- त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि समाजसेवेतील निष्ठेमु ळे प्रत्येक मतदाराच्या मनात “यावेळी आपला खरा प्रति निधी मिळणार” अशी आशा फुलली होती.
- पण या निर्णयाने मागे हटताना देखील त्यांनी लोकांच्या हृदयात आपलं स्थान अधिकच उंचावलं आहे.
- स्वतः दिनेश मांगले म्हणाले :
- “लोकसेवा माझ्यासाठी राजकारणाचा मार्ग नाही, तर जी वनाचा श्वास आहे. सत्ता,पद वा प्रतिष्ठेपेक्षा जनतेचा विश्वा स हा माझ्यासाठी मोठा खजिना आहे.
- मी निवडणूक लढवत नसल्याचा निर्णय घेतला असला त री माझं समाजकार्य अखंड सुरूच राहील. मी कायम तुम च्यातला एक, तुमच्यासोबतच राहणार आहे.”
- त्यांच्या या शब्दांनी अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण हा निर्णय फक्त एका उमेदवाराचा माघार नाही, तर प्रामाणिकतेचा, निस्वार्थ सेवेचा आणि लोकांव रील नात्याचा पुरावा आहे.
- आज परांडा–शेळगाव सर्कलमध्ये राजकीय भूकंप घडला आहे; पण त्याचवेळी समाजकारणाला एक नवी दिशा मि ळाली आहे.
- निवडणुकीच्या गदारोळातही सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देणा रा नेता अस्तित्वात आहे, हा विश्वास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









