दसपटीचे प्रतापराव शिंदे यांचा कर्तृत्व, क्रीडा आणि कर्तव्यनिष्ठेचा हिरक महोत्सवी प्रवास.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :-काही व्यक्ती आप ल्या कार्याने, समर्पणाने आणि सेवाभावाने समाजाच्या अं तःकरणात कायमचे स्थान निर्माण करतात.
  • अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक तेजस्वी नाव म्हणजे दसपटी विभागातील पेढांबे गावचे सुपुत्र प्रतापराव शिंदे… शिक्षण, कला, क्रीडा, समाजकार्य आणि राजकारण या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या व्यक्तित्वात शिस्त, जिद्द, प्रामाणिकता आणि लोकसेवेची निष्ठा एकवटलेली आहे.
  • प्रतापराव यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.आदर्श शाळा पेढां बे येथे, तर माध्यमिक शिक्षण अलोरे हायस्कूल येथे झाले.
  • बालपणापासूनच त्यांच्यातील कर्तृत्वाची झलक शिक्षकां च्या नजरेत आली होती. शिक्षणासोबतच त्यांनी कबड्डी या मातीतल्या खेळात अप्रतिम कौशल्य दाखवत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
  • त्यांच्या चिकाटीने आणि क्रीडावृत्तीने त्यांना मुंबई पोलीस दलात भरती होण्याची संधी मिळाली आणि याच क्षणापा सून त्यांच्या जीवनातील नवा अध्याय सुरू झाला.
  • मुंबई पोलिस सेवेत कार्यरत असताना त्यांनी केवळ आप ली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली नाही, तर कबड्डीच्या मैदानावर ही संघाचे नेतृत्व करत असंख्य खेळाडू घडवले.
  • मुंबई पोलिस कबड्डी संघाचे कर्णधार व प्रशिक्षक म्हणून त्यांनी संघाला नवे यश मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेक तरुणांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले.
  • क्रीडाविकासाच्या वाटचालीत त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारणी सदस्य तसेच मुंबई उप नगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि कबड्डीच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न केले.
  • त्यांच्या क्रीडाभक्तीमुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आणि कबड्डीला नवी प्रतिष्ठा लाभली.
  • नोकरीच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतूनही त्यांनी आपला समा जकार्याचा ध्यास सोडला नाही. आपल्या पेढांबे या मूळ गावी त्यांनी अनेक उपक्रम राबवून गावाच्या विकासाला चालना दिली.
  • श्री.रामवरदायनी मंदिर देवस्थानाचे सलग दहा वर्षे अध्य क्ष म्हणून त्यांनी मंदिर परिसराचे सुशोभीकरण,रस्ते, पाणी पुरवठा, शाळा उभारणी, तसेच पेढांबे गावची ग्रामदेवता श्री सुकाईदेवी मंदिराच्या पुनर्बांधणीसारखी अनेक उल्ले खनीय कामे केली.
  • त्यांच्या नेतृत्वामुळे गावात केवळ धार्मिक नव्हे तर सामा जिक एकतेचा भावही दृढ झाला.
  • समाजकार्याची प्रेरणा त्यांना त्यांचे आजोबा कारभारी ता नाजीराव शिंदे, चुलते मधुकरराव शिंदे आणि बंधू बाबारा मराव शिंदे यांच्या कार्यातून लाभली.
  • या संस्कारवृक्षाच्या छायेखाली वाढलेल्या प्रतापराव शिंदे यांनी जनसेवा हेच जीवनाचे ध्येय मानले. त्यांनी समाजा साठी केलेली प्रत्येक कृती ही नि:स्वार्थ, सच्च्या सेवाभावा तून प्रेरित होती.
  • त्यांच्या कार्याचा परीघ समाजसेवेपुरताच मर्यादित राहिला नाही. राजकारणातही त्यांनी निष्ठेने पाऊल टाकले आणि शिवसेना पक्षात तालुकाप्रमुख,पंचायत समिती सदस्य,उप सभापती तसेच उपजिल्हाप्रमुख या जबाबदाऱ्या समर्थप णे सांभाळल्या.
  • त्यांचे नेतृत्व जनतेच्या विश्वासावर आधारित होते, आणि त्यांच्या काळात अनेक विकासकामांना गती मिळाली.
  • राजकारण त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग नव्हता, तर सेवेचा साधनमार्ग होता आणि हाच त्यांचा वेगळेपणा ठरला. प्रता पराव शिंदे यांचे आयुष्य म्हणजे परिश्रम, प्रामाणिकता आ णि जनसेवेचे सुंदर मिश्रण आहे.
  • त्यांचा प्रत्येक दिवस समाजाच्या भल्यासाठी आणि पुढी ल पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी त्यांची जीवनशैली आहे.
  • त्यांच्या वर्तनातील साधेपणा, विचारातील परिपक्वता आणि कृतीतील प्रामाणिकता हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
  • बुधवार दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी वाढदिवस असणा ऱ्या सन्माननीय प्रतापराव यांच्या पष्ठब्दिपुर्ती जिवनाची अशी आहे ही गाथा यशोदिपाची.
  • अशा बहुगुणी, क्रीडाप्रेमी, समाजहितैषी आणि नेतृत्वगुणां नी संपन्न व्यक्तिमत्त्वाचा गौरव करणे हीच खरी कृतज्ञतेची भावना ठरेल.
  • त्यांच्या साठाव्या (हिरक महोत्सवी) वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांचे पुढील जीवन आरोग्यदा यी, आनंदमय आणि समाजसेवेच्या नव्या अध्यायांनी उज ळत राहो. अशी मनोकामना परिसरातील जनतेने व्यक्त केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles