परंडा मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांची अखेर बदली….! नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची बद्दलिसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून केलेल्या आंदोलनाला यश; परंडा शहरात उलट सूलट चर्चा सूरू.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :-परंडा नगरपरिषदेच्या मुख्या धिकारी मनिषा वड्डेपल्ली यांचा कार्यकाळ तीन वपपिक्षा जास्त झाल्याने, त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
  • राज्य निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार, बङ्गेपल्ली यां ची मुरुम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माणून बदली करण्यात आली आहे.
  • बदलीची मागणी आणि हलगी वाजवून आंदोलन निवडणू क प्रक्रियेदरम्यान निःपक्षने पध्दतीने कामकाज पार पाड ण्यासाठी मुख्याधिकारी वड्डेपल्ली यांची तात्काळ बदली करण्याची मागणी समीरखाँ मतिनखाँ पठाण, सहेमतुल्ला सन्नाऊल्लाखौँ पठाण, नुरोद्दीन मोहम्मद इद्रीस चौधरी, आ णि इस्माईल अब्दुल सत्तार कुरेशी यांनी केली होती.
  • मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी या नागरिकांनी राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी तथा जि ल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
  • मागणीनंतर दोनच दिवसांनी, महणजेच ३० ऑक्टोबर रो जी, या प्रमुख कार्यकत्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी का र्यालयासमोर हलगी वाजवून अभिनव आंदोलन केले.
  • “तीन वर्षपिक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यां ची निवडणूक काळात बदली करावी’ या निवडणूक आयो गाच्या नियमाकडे लक्ष वेधण्यासाठी हे तीव पाऊल उचल ण्यात आले होते.
  • निवडणूक आयोगाचा नियमावर आधारित निर्णय नाग‌रि कांच्या मागणीची आणि निवडणूक आयोगाच्या ‘तीन वर्षां पेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची बद ली’ या महत्त्वपूर्ण निदेर्शानुसार प्रशासनाने दखल घेतली.
  • मुख्याधिकारी मनिषा वड्डेपल्ली यांचा परंडा येथील कार्य काळ तीन वर्षांहून अधिक झाल्यामुळे, त्यांची तात्काळ प्रभावाने परंडाहून मुरुम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
  • निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या प्रशासकीय बदला मुळे परंडा शहरातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली असून, समीरखाँ मतिनखाँ पठाण, रहेमतुल्ला सन्नाऊल्लाखौँ पठाण, नुरोद्दीन मोहम्मद इझीस चौधरी, आणि इस्माईल अब्दुल सत्तार कुरेशी यांनी केलेल्या जन आंदोलनाच्या यशाचे हे स्पष्ट उदाहरण मानले जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles