सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित….!

  • प्रतिनिधी : योगेश सुळे :-दि. 28 नोव्हेंबर रोजी (शुक्रवा र) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्र ताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली.
  • या भेटी दरम्यान शौचालय, पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुवि धाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे ‘ आगार व्यवस्थापक ‘ यांना निलंबित करण्याचे आदेश प रिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
  • आज दुपारी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पा हणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त प रिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले.
  • शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती, अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या. तसेच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती.
  • तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अ‌ त्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले. पाण पोईच्या 5 नळा पैकी केवळ एकच नळ सुरू होता.
  • या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नि यंत्रक यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत.
  • त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदा री निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी एस.टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकी य संचालक यांना तात्काळ दिले.
  • विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करू न प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्दे श आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिले होते.
  • याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधा मध्ये हलग र्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम देखील भरला होता.
  • परंतु सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीबद्दल कोण ताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्या मुळे अत्यंत नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले आहेत.
  • तथापि, राज्यातील एसटीच्या 251 आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषत: बसस्थानकावरील महि ला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हल गर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही.असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles