
शाळेतच मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा. – डॉ.उपेंद्र गळगट्टे
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- शालेय जीवनापासून वि द्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत केल्यास भविष्यात चांगले वैज्ञानिक घडतील.
- वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले विद्यार्थी शास्वत विकास कर तील असे मत डॉ.उपेंद्र गळगट्टे यांनी व्यक्त केले. यमुना न गर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल आयोजित शालेय वि ज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

- यावेळी मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा साब ळे,पर्यवेक्षक विजय पाचारणे,राजीव कुटे उपस्थित होते.
- यावेळी गळगट्टे यांनी विद्यार्थ्यांना विविध शास्त्रज्ञांची उदा हरणे देत विद्यार्थ्यांनी प्रयोगाच्या माध्यमातून व्यक्त व्हावे असे मार्गदर्शन केले.
- यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचे कौतुक केले.तसेच रांगोळीतून साकारलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगाची,आकृत्यांची पाहणी केली.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता गायकवाड तर आभार प्र शांत कुलकर्णी यांनी मानले.विज्ञान प्रदर्शनासाठी गंगाधर वाघमारे,आशा कुंजीर ,गौरी देशपांडे,वृषाली सलगर, म नीषा बोत्रे,उमा बीर्जे,गंगाधर सोनवणे या शिक्षकांनी परि श्रम घेतले.

- या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन ए कबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख सहकार्यवाह प्रा.डॉ .ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाहक प्रा.डॉ.निवेदिता एकबो टे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हीजिटर प्रमोद शिंदे यांनी कौतुक केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











