
संत गाडगे बाबा महान समाज सुधारक होते – प्राचार्य डॉ सुनील जाधव.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परांडा दि. 20 डिसें बर 2025 संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक महान सं त कीर्तनकार आणि समाज सुधारक होते.
- अज्ञान अंधश्रद्धा जातीयवाद आणि अस्वच्छते विरुद्ध ल ढण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे एकमेव संत गाडगेबाबा होते.
- असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्या लयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी संत गाडगेबाबा यां च्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या अभिवादन का र्यक्रमांमध्ये आपले विचार व्यक्त केले.

- पुढे बोलताना प्राचार्य डॉ सुनील जाधव म्हणाले की संत गाडगेबाबा यांनी शिक्षण आणि दीनदुबळ्यांची सेवा यावर भर दिला.
- मंदिरातील दगड पूजा करण्याऐवजी गरजूंना मदत करणे यासारख्या विचाराने समाजाला त्यांनी दिशा दिली.
- याप्रसंगी संत गाडगेबाबा आणि श्री भवानी शिक्षण प्रसार क मंडळ धाराशिव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.रा.गे शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ सुनील जाध व आणि मराठी विभाग प्रमुख डॉ गजेंद्र रंदील यांच्या हस्ते करण्यात आले.
- कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
- या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव सां स्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.भाऊसाहेब दिवाने कनिष्ठ विभागाचे पर्यवे क्षक प्रा किरण देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्रीमती प द्मा शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.दी पक तोडकरी व प्रा जगन्नाथ माळी यांच्यासह कनिष्ठ वरि ष्ठ विभागातील प्राध्यापक सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्राध्यापक जग न्नाथ माळी यांनी आभार मानले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











