
इस्क्रा फाउंडेशन तर्फे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोठारे येथे एकदिवसीय कलाविकास कार्यशाळा ह्या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद…!
- प्रतिनिधी : हिराजी देसले :- इस्क्रा फाऊंडेशन ही संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन तसेच समाज विकास या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
- समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ज्ञानवृद्धीसाठी संस्था सातत्याने प्रय त्नशील आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र देस ले(गुरु) यांनी सांगितले.
- इस्क्रा फाऊंडेशन अंतर्गत कला विकास कार्यशाळा हा उपक्रम महाराष्ट्रातभर राबविण्यात येत आहे.

- या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांमधील संगीत, वक्तृत्व, नाटक, कथाकथन अशा विविध कला प्रकारांतील आवड व कौशल्यांना प्रोत्साहन दिले जाते.
- हा उपक्रम आसनगाव–शहापूर तालुक्यातील कोठारे गा वातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला.
- यामध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कला विकास कार्यशाळेच्या संस्थापिका प्रणाली कदम यांनी मार्गदर्शन केले.
- मुलांमधील कला वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात, त्या ओळखून त्यांना योग्य वाव दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
- तसेच इस्क्रा फाउंडेशनचे डायरेक्टर चेतन कांबळे यांनीही आपले मत व्यक्त केले.
- सोपान मस्के सर यांनी (संगीत विशारद) यांनी संगीत बा बत मार्गदर्शन करताना, गायनाची आवड जोपासण्याबरो बरच सूर, ताल व लय योग्य पद्धतीने लावण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
- शुभम जाधव सर यांनी नाटक व पथनाट्य याविषयी मा र्गदर्शन केले. सचिन वीर यांनी कथाकथन बाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
- त्याचबरोबर इस्क्रा फाउंडेशनचे संस्थापक हरीश्चंद्र देसले (गुरु) यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर संवाद साधत, ताण निर्माण हो ण्याची कारणे व ताण दूर करण्याच्या उपाययोजना सांगि तल्या, अशी माहिती संस्थेच्या शहापूर प्रकल्प व्यवस्था पक श्वेता पाटील आणि अक्षय लखांबरे यांनी दिली.
- पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसोबत खेळ, गाणी घेण्यात आली या उपक्रम मध्ये शिक्षणाचे महत्त्व समजावून सां गण्यात आले.
- गीता आढाव,राहुल बनसोडे,नेहा भोसले,अस्मिता कहाळे, अर्पिता पिळणकर हे कार्यकर्ते प्रत्यक्षात उपस्थित राहिले तसेच अप्रत्यक्षरित्या या उपक्रमात, प्रतीक जगताप, डॉ.अ जित कांबळे, वर्षा वालकोळी,प्रतीक भालके,अमित जाध व,चैतन्य देसाई हे सदस्य सुध्दा सहभागी झाले होते.
- अशी माहिती फाउंडेशनच्या सचिव प्रगती कांबळे यांनी दिली. हा उपक्रम घेण्याची संधी पंढरीनाथ वेखंडे साहेब यांनी दिली.
- तसेच मुख्याध्यापक श्री.अनंता फर्डे सर आणि आश्रमशा ळेतील पवार सर, उज्वला देसले (हरड),पाटील सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित राहून त्यांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

- इस्क्रा फाउंडेशनचे संस्थापक हरिश्चंद्र देसले(गुरु) आणि सचिव यांच्यातर्फे आर्थिक सहकार्य आणि इतर विविध प्रकारची मदत करण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











