राजापूर तहसील कार्यालयात ५ ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’; नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- महसूल विभागाती ल प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोड व परस्पर संमतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शास नाच्या महसूल व वनविभागामार्फत ‘महात्मा जोतीराव फु ले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे.
  • या अभियानांतर्गत राजापूर तहसील कार्यालयात सोमवा र, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या लोक अदालतीचा तालुक्यातील शेतकरी, नागरिक आ णि संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तह सीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.
  • शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार असू न, दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
  • त्यानुसार राजापूर तहसील कार्यालयाकडे प्रलंबित असले ली अर्धन्यायिक प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संम तीने तडजोडीद्वारे निकाली काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
  •  या उपक्रमात जमिनीचे हिस्से व हक्क, जमिनीच्या वाट पाचे दावे तसेच वहिवाटीच्या रस्त्यांशी संबंधित वाद तड जोडीने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे.
  • त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महसुली वादांवर परस्पर सहमतीने तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • ज्या कार्यालयात महसुली दावा किंवा अपील प्रलंबित आ हे, त्या ठिकाणी संबंधित दोन्ही पक्षकारांनी स्वतः अथवा आपल्या वकिलामार्फत शासन निर्णयातील ‘प्रपत्र-अ’नु सार तडजोडीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जांची छाननी केल्यानंतर संबंधित पक्षकारांची संमती निश्चित केली जाईल. त्यानंतर नियमानुसार तडजोडनामा तयार करून लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षकारां च्या संमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येतील.
  • या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली नि घण्यास मदत होणार असून, नागरिकांचा वेळ, खर्च आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या फेऱ्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
  • तसेच महसूल प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
  • संबंधित पक्षकारांनी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाज ता राजापूर तहसील कार्यालयात उपस्थित राहून या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासना ने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles