वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय गर्भधारणा समाप्ती अधिनियम १९७१ ची अंमलबजावणी वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येते.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- दि. २३/०१/२०२६ वसई-वि रार शहर महानगरपालिकेत गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस) प्रतिबंध कायदा १९९४ सुधा रित २००३ तसेच वैद्यकीय गर्भधारणा समाप्ती अधिनिय म १९७१ ची अंमलबजावणी वैद्यकीय आरोग्य विभागामा र्फत करण्यात येते.
  • वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार “केअर ॲन्ड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, १०१-१०६, कामधेनू सी.एच .एस लि, पहिला मजला, एसबीआय बँकेसमोर, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व) येथे अवैधरित्या गर्भपात करीत असल्याची माहिती कार्यालयात प्राप्त झाली होती.
  • त्यानुषंगाने मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र. से.), मा.अतिरिक्त आयुक्त (वैद्यकीय आरोग्य) श्री.दिपक सावंत व मा.उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य) श्रीम.स्वाती देश पांडे ह्यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.भक्ती चौधरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पांढरे व डॉ.कृष्णा गोसावी यांना सदर रुग्णालयाच्या तपा सणीसाठी पाठविण्यात आले होते.
  • दि.२२/०१/२०२६ रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पांढरे व डॉ. कृष्णा गोसावी यांनी स्टिंग ऑपरेशन करुन “केअर अॅन्ड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, १०१- १०६, कामधेनू सीएचएस लि, पहिला मजला, एसबीआय बँकेसमोर, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व) येथे वैद्यकीय गर्भधारणा समाप्ती अधिनियम १९७१ अंतर्गत विना पर वाना व गर्भपाताच्या गोळ्या देण्याचा कोणताही अधिकार नसताना.
  • तसेच शैक्षणिक अर्हता नसताना अवैधरित्या रुग्णाला गर्भ पात औषधे दिल्या प्रकरणात सदर रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रकांत शंभुनाथ मिश्रा व अरुण शुक्ला तसेच संतोष भवन, वालईपाडा येथील कुशल क्लिनिकचे डॉ.संजीव सिं ग हे दोषी आढळल्याने वसई-विरार शहर महानगरपालिके च्या वैद्यकीय अधिकारी द्वारा आचोळे पोलिस ठाणे येथे प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला.
  • वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात बेकायदे शीर पीसीपीएनडीटी केंद्र / गर्भलिंग निदान करीत असले ले केंद्र व अवैध एमटीपी केंद्रांवर आळा घालण्यासाठी वै द्यकीय आरोग्य विभाग कार्यरत राहणार असून नागरिकां ना आवाहन करण्यात येत आहे.
  • तसेच बेकायदेशीर पीसीपीएनडीटी केंद्र / गर्भलिंग निदान करीत असलेले केंद्र व अवैध एमटीपी बाबत तक्रार वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, वैद्यकीय आरो ग्य विभाग, सातवा मजला, म्हाडा कॉलनी, विरार (पश्चिम) येथे नोंदविण्यात यावी. तसेच याबाबतची माहिती आमची मुलगी वेबसाईट (www.amchimulgimaha.in) व हेल्पलाईन क्रमांक. १८००- २३३-४४७५, १०४ ही टोल फ्री दुरध्वनी क्रमांकावर देण्यात यावी. आपण दिलेल्या माहितीबाबत गोपनीयता ठेवण्यात येईल.
  • वैद्यकीय आरोग्य विभाग : वसई-विरार शहर महानगरपालिका
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles