
खेड तालुक्यातील शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुलचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.
- प्रतिनिधी : खेड : प्रमोद तरळ :- नागेश्वर शिक्षण प्रसार क मंडळ मुंबई, संचालित शारदा विहार माध्यमिक विद्याल य चोरवणे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आयोजित करण्यात आला होता.
- या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.डी.पी.पाटील सर(संस्था पक सचिव विश्ववारणा पब्लिक स्कूल तळसंदे कोल्हापू र),श्री.मदनजी गायकवाड (सामजिक कार्यकर्ते, सातारा जिल्हा पोलिस मित्र), श्री.एस. एल. पाटील सर (राज्यपु रस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक शा.वि. मा.वि चोरवणे) उपस्थित होते.

- कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुधाकर महादेव उत्तेकर हे होते.
- संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार श्री.भिकाजी महादेव उतेकर, माजी अध्यक्ष श्री.सुरेश धोंडू मोरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.विठ्ठल गोविंद उतेकर, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.के.डी उतेकर, संस्थेचे सचिव श्री किशोर जाधव,Advocate तसेच संस्थेचे CEO श्री.प्रवी ण शिंदे,संस्थेचे खजिनदार श्री वसंत मोरे,सैनिक वसतिगृ ह प्रमुख श्री.प्रताप के.उतेकर, चेअरमन श्री प्रताप धारोजी उतेकर, श्री.वामन उतेकर, सल्लागार श्री दीपकजी सकपा ळ,चोरवणे गावचे पोलीस पाटील श्री.विनोद शिंदे,ग्रूप ग्राम पंचायत चोरवणे निवेचे उपसरपंच श्री.प्रवीण सावंत,माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.प्रकाश शिंदे,सुभाष चव्हाण,तसेच चोरवणे निवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
- तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.व्ही एस गावडे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. अ नेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
- विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी माजी विद्यार्थी यांनी पुढा कार घेतला पाहिजे असे मनोगत डी.पी.पाटील सर यांनी व्यक्त केले.
- संस्थेचे माजी अध्यक्ष व सल्लागार श्री बी.एम.उतेकर यां नी आतापर्यंत संस्थेने केलेल्या कामांचा व पायाभूत सुवि धांची माहिती तसेच विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी निवा सी वसतिगृह चालू करुन वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना संस्था पुरवीत असलेल्या पाया भूत सुविधांची माहिती दिली.
- स्नेहमेळाव्याला अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. मा जी विद्यार्थी सौ.रजनी उतेकर (मुख्याध्यापिका रसाळगड) ,प्रवीण उतेकर,विनोद शिंदे,प्रवीण शिंदे,किशोर जाधव, म हादेव उतेकर,प्रथमेश पालांडे, प्रसाद उतेकर,श्रद्धा उतेकर इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
- जुन्या आठवणी जाग्या झाल्या असे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.
- संस्थेच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या सहकार्याने, पुढाका राने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला.
- या सर्व प्रक्रियेमध्ये स्वयंस्फूर्तीने अगदी सुरवातीपासून का र्यक्रम यशस्वी होईपर्यंत सहभागी होऊन सहकार्य करणा रे माजी विद्यार्थी उतेकर सर,मंगेश साळुंखे, अनिल उतेक र, भगवती ताई,प्रसाद उतेकर सुदर्शन जाधव, सागर उते कर,संतोष उतेकर,प्रशांत उतेकर, प्रथमेश पालांडे,तन्वी मो रे, श्रद्धा उतेकर,सुवर्णा शिंदे, प्रतीक मोरे,योगेंद्र मोरे,रुक्मि णी उतेकर, दिपक उतेकर,विनायक जाधव, प्रवीण सावंत, रणजीत सावंत,रजनी ताई,दिपक चव्हाण, सचिन शिंदे, प्रि यंका सकपाळ,अर्चना शिंदे, किशोर शिंदे,राजेश साळुंखे, निलेश उतेकर, दिपक गायकवाड, मंगेशजी उतेकर, मंगेश जाधव,अनाजी उतेकर आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक मा जी विद्यार्थी होते.
- आपल्या शाळेप्रती, गुरुजनांप्रती अखंड निःस्वार्थ प्रेम, आ पुलकी आणि जिव्हाळा पाहण्यासाठी मिळाले.
- एकूण नियोजनाची संपूर्ण बांधणी मांडणी करणारे संस्था नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई,शाळेचे मुख्याध्याप क व सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
- कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विद्यालयाचे माजी विद्या र्थी सुदर्शन जाधव यांनी केले आणि कार्यक्रमाची प्रस्ताव ना श्री.अनिल उतेकर सर यांनी केली.
- २५ जानेवारी रात्री ८ ते ११ या वेळेत वार्षिक स्नेहसंमेलन व २६ जानेवारी सकाळी ८ वाजता सैनिक पॅटर्न निवासी वसतिगृह चे मानवंदना व महापरेड, कवायत मानवी मनो रे,अबस्टॅकल्स, कसरती आणि विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











