परंडा तालुक्यातिल तालूका प्रमुख मेघराज पाटील उबाटा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री तथा भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे आमदा र प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली परंडा ता लुक्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळत आहे.
  • शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेली जनसेवेची कामे आणि मतदारसंघात राबवले जाणारे महत्त्वाकांक्षी विका स प्रकल्प यांमुळे शिवसेनेला मोठा जनाधार लाभत आहे.
  • याच विकासकामांवर विश्वास ठेवून शिवसेना (उबाठा) गटाचे परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
  • आ.सावंत यांनी यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यां ना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्याची तळमळ असणारे युवा नेतृत्व मेघराज पाटील यांच्यामुळे परंडा तालुक्यात पक्ष अधिक सक्षम होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्य क्त केला.
  • आमदार सावंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधता ना सांगितले की, आम्ही जिल्ह्यात शिवसेना संघटना मज बूत करून विकासाची गंगा सर्वसामान्य घरांपर्यंत पोहोच वली आहे.
  • आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरिकांशी जनसंपर्क वाढवून शिवसेनेचे विचार आणि कार्य घराघरां त पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
  • याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, मा. जि.प. सभापती नवनाथ आप्पा जगताप, रिपाई प्रदेश सर चिटणीस संजयकुमार बनसोडे, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, पै.विशाल नाना देवकर, यांच्यासह तालुक्या तील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरि क मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles