
शेतकाऱ्यांची जनावरे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांच्या ताब्यात.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्हाति ल मौजे लासोना शिवारातील एका शेतक-याच्या ०५ म्ह शी चोरीस गेलेबाबत पोरटे बेंबळी येथे अज्ञाताविरूदध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- धाराशिव जिल्हयात अशाच प्रकारचे जनावरे चोरीचे अने क गुन्हे दाखल असल्याने मा. श्रीमती रितू खोखर,पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना आ देशित केले होते.

- सपोनि कासार व पथक यांना गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून नेकनूर जि बीड येथील एक संशयित इसम व वाहन या चोरीचे परीसरात येवून गेला असल्याची माहिती मिळून आली.
- त्यांनी तात्काळ इसम नामे चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे, रा नन्नवरे वस्ती, नेकनूर, ता जि बीड यास नेकनूर येथून ता ब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचा अन्य एक साथीदार शंकर सुरेश च व्हाण रा ढोकी, यास ताब्यात घेण्यात आले आहे.
- आरोपींनी यापुर्वीही येवती, लासोना, बेंबळी, कोंड, तुळजा पूर, काटी सावरगाव, सांगवीमार्डी, सुरतगाव, वैराग, माण केश्वर शिवार या ठिकाणावरून म्हशी चोरी केल्या अस ल्याची कबुली दिली आहे.
- ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकूण ०८ म्हशी, गुन्हे क रतेवेळी वापरलेले वाहन महिंद्रा पिकअप व हिरो स्प्लेंडर असा एकूण १२,१५,००० रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
- नमुद आरोपींनी धाराशिव जिल्हयातील एकूण १३ म्हशी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पोलीस आरोपी चे अन्य साथीदारांचा व म्हशींचा शोध घेत आहेत.
- नमुद आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कारवाईस्तव पोस्टे धाराशिव ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

- सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधि क्षक धाराशिव मा. श्रीमती शफकत आमना अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन का सार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी,पोह फरहान पठाण,, चापोह रत्नदिप डोंगरे, नागना थ गुख यांचे पथकाने केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











