ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या इच्छूकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावेत; कोकणकर अजित गोरुले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी.

  • प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :-कोकणातील राय गड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या इच्छूकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयो जित करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि कोकणकर अजित गोरुले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री स न्मा.ना.एकनाथजी शिंदे तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामा जिक संघटनेचे संस्थापक आणि शिवसेना उपनेते श्री नि लेशजी सांबरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
  • जिजाऊ संघटनेचे कार्य अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. समाजासाठी जे कोणी करण्याचे धाडस दाखवले नाही, ते कार्य मग शैक्षणिक UPSC असो किंवा CBSE तसेच मोफत दवाखाना इत्यादी सेवाकार्य प्रभावीपणे क रून दाखवले आहे, याबद्दल श्री सांबरे हे कौतुकास पात्र आहेत.
  • ग्रामीण भागात अनेक वेळा सरपंच किंवा ग्रामपंचायत स दस्य म्हणून प्रतिनिधी निवडून येतात मात्र प्रशासन, आर्थि क व्यवहार, शासकीय योजना, कायदे व कारभार यांचे आवश्यक ज्ञान व प्रशिक्षण नसल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेणे कठीण जाते.
  • काही वेळा अशा परिस्थितीचा गैरफायदा घेतला जातो आणि निवडून आलेले प्रतिनिधी स्वाक्षरीपुरते किंवा इतरां च्या मार्गदर्शनावर अवलंबून राहवे लागते. ही परिस्थिती लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
  • यासाठी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार, भावी सदस्य व सरपंच यांच्यासाठी प्रशा सन, कायदे, ग्रामविकासाच्या योजना, आर्थिक पारदर्शक ता व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावेत.
  • या सर्वांची जबाबदारी मा.उप- मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उपनेते असलेल्या श्री सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेकडे सोपविण्यात यावी.
  • हे प्रशिक्षण शिबीर जर संस्थेमार्फत राबविले गेले तर सक्ष म, स्वावलंबी आणि निर्णयक्षम नेतृत्व घडण्यास मोठी मद त होईल आणि जिजाऊ संघटने बरोबर ग्राम उध्दाराचे महत्वाचे कार्य त्यांच्या कडून घडेल असा विश्वास अजित गोरुले यांनी व्यक्त केला आहे.
  • ग्रामीण भागातील समस्या व त्या निवारण करण्यासाठी लागणारा अभ्यास व बारकावे यांचे सखोल प्रशिक्षण इ च्छुक उमेदवारांना देणे गरजेचे आहे.
  • केंद्र व राज्य सरकारकडून तसेच शासनाच्या विविध योज नांतून निधी कसा आणता येईल याचीही इच्छुक उमेदवा रांना माहिती देण्यात यावी.
  • ग्रामविकासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या या विषयाकडे गंभीर आणि सकारात्मक दृष्टीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी योग्य योग्य ती कार्यवाही करुन ही जबाबदारी जिजाऊ संघटनेकडे द्यावी अशी मागणी अजित गोरुले यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles