राज ठाकरेंची शिवतीर्थावर तोफ धडाडली; ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ मोहिमेचा शुभारंभ.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ता वर दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क (शिवतीर्थ) मै दानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य मेळावा संपन्न झाला.
  • या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्याच्या विकासाचा नवा रोडमॅप मांडताना ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ या महत्त्वाकांक्षी उपक्र माची घोषणा केली.
  • बातमीचे ठळक मुद्दे:
  • ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ वेबसाईटचे लोकार्पण: राज ठाकरे यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेकडून सूचना मागवण्यासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही डिजिटल प्लॅटफॉर्म/वे वेबसाईट लॉन्च केली.
  • नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी आपल्या संकल्पना या वेबसा ईटवर मांडण्याचे आवाहन त्यांनी केले.
  • तरुणांना आवाहन: “इन्स्टाग्रामच्या आभासी जगातून बा हेर पडा आणि राज्याच्या प्रत्यक्ष विकासात सहभागी व्हा,” असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थित तरुण कार्यक र्त्यांना केले.
  • सरकारवर टीका:
  • राज्यातील वाढते कर्ज (११ लाख कोटी रुपये) आणि पा याभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर कडक शब्दात टीका केली.
  • ऐतिहासिक वारसा:
  • भाषणादरम्यान त्यांनी महाराष्ट्राला आकार देणाऱ्या थोर महापुरुषांचा गौरव केला आणि महापुरुषांकडे जातीच्या चष्म्यातून न पाहण्याचा सल्ला दिला.
  • परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा: राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेवर आणि देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवरही भाष्य केले.
  • या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो मनसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी या सभेतून पक्षबांधणीचा नवा मंत्र दिला आहे.
  • जिल्हा आध्यक्ष आबा ढवळे, तालूका आध्येक्ष सुरेश पाटील, सचीव नागेश मोरे, तालूका उ.रोहीत टिकोर शहर आध्यक्ष नवनाथ कसबे, शहर उपाध्यक्ष प्रशांत नांगरे यांच्यासह लाखो मनसैनिक उपस्तीत होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles