
युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांचा व्हेळ फाटा – झर्ये रस्त्यासाठी एल्गार; पाचक्रोशीतील जनतेचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार.
- प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील व्हेळ फाटा ते झर्ये मार्गाची दुरवस्था झाली असून विद्यार्थी,रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांचा रोजचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
- व्हेळ फाटा ते झर्ये हा मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे ?” असा संतप्त सवाल या मार्गावरून दररोज प्रवास कर णाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
- या मार्गावरून पाचक्रोशीतील शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, शेतकरी, कामगार तसेच आजारी रुग्णांना निय मित प्रवास करावा लागतो.

- मात्र रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, प्रवा स म्हणजे रोजची कसरत आणि जीव मुठीत घेऊन केले ला प्रवास अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी आता व्हेळ फाटा – झर्ये रस्त्याचा प्रश्न शेवटपर्यंत लावून धरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
- “मोठमोठ्या गाड्यांमधून आणि हेलिकॉप्टरमधून ये णाऱ्यां ना खड्डे कसे दिसणार?”
- युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनि धींना सवाल करताना म्हटले की, मोठमोठ्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना या रस्त्याची खरी परिस्थिती कदाचित जाणवणार नाही.
- काहीजण हेलिकॉप्टरमधून येतात; त्यामुळे जमिनीवरच्या रस्त्याची अवस्था आणि सामान्य माणसाला सहन करावा लागणारा त्रास त्यांच्या लक्षात येणार कसा…?
- मात्र या रस्त्यावरून प्रवास करणारा सामान्य नागरिक प्र त्येक खड्डा सहन करतो.
- “इथे माणसं राहतात, नुसते आकडे नाहीत!” असा सवाल सचिन बेर्डे यांनी उपस्थित केला.
- निवडणुकीपुरती जनता आठवते, मग रस्ता का नाही? नि वडणुका जवळ आल्या की अनेक नेते आणि पुढारी जन तेच्या दारात येतात.
- विकासाची आश्वासने दिली जातात. मात्र निवडणूक संप ल्यानंतर सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे किती लक्ष दिले जाते, हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
- आजपर्यंत या विभागातून अनेक लोकप्रतिनिधी निवडून गेले. मात्र व्हेळफाटा–झर्ये मार्गाची आजची परिस्थिती ज नतेसमोर आहे. मग एवढ्या वर्षांत या रस्त्याचा प्रश्न काय म का राहिला?
- “आता फक्त आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही!”
- युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगि तले की, हा प्रश्न कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून पा चक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न आहे.
- रस्ता कधी होणार?
- निधी किती उपलब्ध आहे?
- अंदाजपत्रक किती आहे?
- काम कधी सुरू होणार?
- कामाची गुणवत्ता कशी राखली जाणार?
- या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे जनतेसमोर आली पाहिजेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
- “आता शांत बसणार नाही; रस्ता होईपर्यंत पाठपुरावा करणार….!”
- व्हेळ फाटा–झर्ये रस्ता हा माझ्यासाठी केवळ एक रस्ता नाही; हा माझ्या पाचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या दैनं दिन जीवनाशी जोडलेला प्रश्न आहे.
- त्यामुळे हा विषय आता केवळ चर्चा करून सोडणार ना ही. संबंधित विभाग, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यां च्याकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार,” अशी भूमिका युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी व्यक्त केली.
- “रस्ता हा कोणाची मेहरबानी नाही; तो जनतेचा मूलभूत हक्क आहे. आश्वासनं नकोत, आता प्रत्यक्ष काम पाहिजे,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला.
- पाचक्रोशीचा एकच आवाज व्हेळ फाटा ते झर्ये रस्ता झाला पाहिजे!
- खड्डे बुजवण्यापुरता उपाय नको, कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता हवा.
- विद्यार्थी, रुग्ण, वयोवृद्ध आणि सर्वसामान्य जनता यांच्या सुरक्षिततेसाठी आता श्री बेर्डे मैदानात उतरले आहेत शेवटी.
- “तुमचा प्रश्न – माझी जबाबदारी;
- तुमचा आशीर्वाद – माझी ताकद!” असे सांगत युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी या मुलभूत ज्वलंत समस्येवर आवाज उठविण्याचा निर्धार केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






