दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरू करा, अन्यथा कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- कोरोना काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास मध्य रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत आहे.
  • त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत कोकणवासीयांनी आ ता थेट कोकण रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देण्याची तयारी केली आहे.
  • दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरु करा, अन्यथा ‘महारा ष्ट्र दिनी’ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवाशां तर्फे ‘जल फाऊंडेशन’ या संस्थेने दिला आहे.
  • गेल्या ३० वर्षे कोकणवासीयांच्या सेवेत धावणारी रत्नागि री पॅसेंजर कोरोना काळात दिवा स्थानकातून चालवण्यात आली. कोरोना महामारी संपल्यानंतर ही गाडी पूर्ववत दा दर-रत्नागिरी मार्गावर चालवणे आवश्यक होते.
  • याबाबत प्रवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला.
  • मात्र त्यानंतरही मध्य रेल्वे प्रशासन गाडीला दादर स्थान कात प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याचे आणि ती वेळ शक्य हो त नसल्याचे कारण देत गाडी पूर्ववत सुरु करण्यास टाळा टाळ करीत आहे.
  • त्याविरोधात कोकणच्या प्रवाशांनी आता आक्रमक पवि त्रा घेतला आहे. दादर स्थानक मध्यवर्ती ठिकाण असून प श्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सोईस्कर आहे.
  • मुंबईतून कोकणात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिलांना सामान घेऊन दिवा स्थानक गाठणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे.
  • असे असताना मध्य रेल्वे प्रशासन जाणूनबुजून ही गाडी पूर्ववत सुरु करत नसल्याचा दावा ‘जल फाऊंडेशन’चे अ ध्यक्ष नितीन जाधव यांनी केला.
  • रेल्वे प्रशासन उत्तर हिंदुस्थानला जाणाऱ्या नवीन गाड्यां ना दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देते, मात्र कोकणच्या गाडीसाठीच जागा नसल्याचे कारण देत आहे.
  • प्रशासनाचा दुजाभाव आता खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.
  • ‘महाराष्ट्र दिना’पूर्वीच गाडी पूर्ववत सुरु करावी, अन्यथा प्रवाशांच्या तीव्र आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीला रेल्वे प्रशासनच जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया नितीन जाध व यांनी दिली.
  • कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून प्रवाशांच्या सेवेत धावणा री दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कोरोनापूर्वीच्या वेळापत्रका नुसार तत्काळ सुरु करावी ही आमची आग्रही मागणी आहे.
  • मात्र मध्य रेल्वे प्रशासन या मागणीकडे जाणूनबुजून दुर्ल क्ष करीत आहे.
  • उत्तरेकडील गाड्यांना सोईस्कर वेळ उप लब्ध करुन देणा रे रेल्वे प्रशासन महाराष्ट्रातील जनतेच्या सोईचा विचार क रीत नाही ही दुर्देवी बाब आहे, अशी तीव्र नाराजी कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी व्यक्त केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles