
पुणे ते राजापूर व्हाया लांजा एसटी पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत जाहीर केली खरी पण त्याच बरोबर प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे त्रास देणे गरजेचे आहे.
- गेली जवळ-जवळ ५० ते ५५ वर्षापासून चालू असलेली पुणे ते व्हाया लांजा मार्गे राजापूर ही लालपरी महामंडळा ने बंद केली दोन तीन वर्ष भांडून, सांगूनही पुणे – राजापूर व्हाया लांजामार्गे जाणारी गाडी चालू केली नाही.

- त्यामुळे लांजा तालुक्यातून पुण्यात नोकरी धंदया निमित्ता ने स्थायिक असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो अशी खंत लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे गावाती ल ज्येष्ठ नागरिक मधुकर स. घडशी (वय ७४) यांनी व्यक्त केली आहे.
- श्री.घडशी यांनी शिमग्यासाठी गावी जायचे म्हणून चौक शी केली असता सध्याची गाडी फक्त रात्रीची असून ती पालीवरून पावसमार्गे राजापूरला जाते.
- काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी अवस्था आहे नाईलाजास्तव पाली पर्यंत दि.२४ फेब्रुवारीचे बुकींग केले.
- गाडी रात्री ८-३० वा. स्वारगेट वरून सुटली ती पालीला म ध्यरात्री ३:३० वा.पोहोचली गाडीतून उतरलो तर असे वाट ले की पालीत की स्मशान भूमीत आलो १० ते १२ मोठी कुत्री फिरत होती.
- दोघेही वयस्कर जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात दबा धरून बसलो कसे बसे स्वच्छता गृहापर्यंत गेलो आणि आत पाहिले तर जिवंतपणी नरकयातना भोगाव्या अशी परिस्थिती होती.
- केवळ फक्त महामंडळाच्या घाणेरड्या व्यवस्थापणामुळे आम्हा सारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास सोसावा लागतो कोकणातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला हवे. विरोधी पक्षाचे सुद्धा आमदार खासदार आहेत.
- त्यांनी तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे वाटते, स त्ता येते सत्ता जाते जर एस.टी महामंडळ एवढे मेटाकुटी ला घायकुतीला आले असेल तर आम्ही, ज्येष्ठ नागरिक जरूर मदत करू.
- आम्हाला अर्धे तिकिट नको पूर्ण तिकिट घ्या पण पुणे ते राजापूर व्हाया लाजा मार्गे गाडी चालू करा.एवढीच माफ क मागणी करीत असल्याचे श्री घडशी यांनी सांगितले.
- खाजगी गाड्या भरपूर आहेत पण त्याचे भाडे आम्हाला परवडणारे नाही एस्. टी अधिकारी, आमदार, खासदार, आर.टी.ओ सर्व मिळून एसटी फायद्यात आणण्यासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करावेत.
- ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा पुणे – राजापूर व्हाया लां जा एसटी सेवा पुन्हा सुरु केल्यास लांजा वासियांना त्या चा आर्थिक दृष्ट्या फायदा होईल.
- महायुती सरकारने जेष्ठ नागरिकांना सवलती दिल्या त्या बद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो पण जेष्ठ नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा असे घडशी यांनी म्हटले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











