परंड्यात डी.बी.ए. समूहाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयं तीनिमित्त परंडा येथे डी.बी.ए. (DBA) समूहाच्या वतीने द रवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन कर ण्यात आले आहे.
  • समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे यां च्या अध्यक्षतेखाली कुर्डूवाडी रोडवरील संपर्क कार्यालया त झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • येत्या १४ एप्रिल २०२६ रोजी परंडा येथील आठवडा बा जार परिसरात हा जयंती उत्सव साजरा होणार आहे.
  • या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी ‘जयंती कमिटी’ ची निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदी ॲड.दयानंद धेंडे तर उपाध्यक्षपदी महावीर बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
  • सामाजिक उपक्रमांची रेलचेल केवळ उत्सवच नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत यावर्षी विविध उपक्रम राबव ले जाणार आहेत.
  • यामध्ये प्रामुख्याने डी.बी.ए.बचत गट: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवीन बचत गट स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
  • मदत वाटप: निराधार महिलांना साड्यांचे वाटप आणि गर जू व हुशार विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या, पेन आणि शालेय साहित्याचे वाटप केले जाईल.
  • आरोग्य सेवा: रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, इमारत व बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी, आरो ग्य सेवा कार्ड वाटप आणि शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
  • सांस्कृतिक कार्यक्रम: भीमगर्जना आणि बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आ योजन करण्यात आले आहे.
  • या बैठकीला हरिभाऊ गोडगे, पिंटू कोळी, कमलाकर खैरे, आनंद बनसोडे, संस्कृत्य बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, ध र्मराज नरोटे, कालिदास काशीद, नागेश थोरात, सूर्योदय सरवदे, सम्यक धेंडे,माऊली पाटील, दत्तात्रय पाटील, दादा कोळी यांच्यासह परंडा शहरातील बहुसंख्य भीमसैनिक व नागरिक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles