
बावची येथील ऑट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी रामचंद्र थिटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- तालुक्यातील बाव ची येथील बहुचर्चित ऑट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी राम चंद्र विक्रम थिटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे.
- या निर्णयामुळे आता आरोपीच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, परंडा पोलिसांच्या कारवाईकडे संपूर्ण तालु क्याचे लक्ष लागले आहे.

- नेमके प्रकरण काय?
- दुधी शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेताशेजारीच आरोपी रामचंद्र थिटे याची जमीन आहे.
- २६ मार्च रोजी जातीय द्वेषातून आरोपीने सोनवणे यांच्या शेतातील पाईपलाईन, बोरवेल आणि सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान केले.
- तसेच, “तुला इथे शेती करू देणार नाही” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली होती.
- याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमा ती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ऑट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- न्यायालयीन घडामोड:
- गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून, अटकेपासून वाचण्यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.
- मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने शासकीय विशेष अभियोगता ॲड.गाडे, ॲड.निकाळजे आणि ॲड.बी.बनसोडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
- तात्काळ अटकेची मागणी:
- न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर फिर्यादी उमेश सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

- गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट असल्याने पीडित कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.
- आता पोलीस या फरार आरोपीला कधी गजाआड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






