
रक्षकच बनले भक्षक’; साथनकुलम कस्टोडियल डेथ प्रकरणी ९ पोलिसांना फाशीची ऐतिहासिक शिक्षा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- संपूर्ण देशाला हादर वून सोडणाऱ्या तामिळनाडूतील ‘साथनकुलम कस्टोडिय ल डेथ’ प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनाव ला आहे.
- लॉकडाऊन काळात पोलीस कोठडीत पी.जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी, तत्कालीन पोलीस निरीक्षका सह ९ पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

- नेमकी घटना काय…..?
- जून २०२० मध्ये कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान, थूथुकु डी जिल्ह्यातील साथनकुलम येथे पी.जयराज यांनी आप ले मोबाईलचे दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
- वडिलांना सोडवण्यासाठी गेलेला मुलगा बेनिक्स यालाही पोलिसांनी बेदम मारहाण करत कोठडीत टाकले.
- कोठडीतील ती ‘काळरात्र’
- १९ आणि २० जूनच्या रात्री पोलीस ठाण्यात या पिता-पुत्रावर संतापजनक आणि क्रूर अत्याचार करण्यात आले.
- सी.बी.आय च्या तपासात समोर आले की, आरोपी पोलि सांनी त्यांना रात्रभर लाठ्यांनी मारहाण केली आणि अन न्वित छळ केला.
- या गंभीर दुखापतींमुळे २२ जून रोजी बेनिक्सचा आणि २३ जून रोजी पहाटे वडील जयराज यांचा मृत्यू झाला.
- न्यायालयाचे कडक ताशेरे
- मद्रास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला.
- सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, ज्यांच्यावर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी होती, त्यांनीच अधिकाराचा गैरवापर करून दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला.
- हा गुन्हा ‘रॅरेस्ट ऑफ रेअर’ (दुर्मिळातील दुर्मिळ) श्रेणीत मोडत असल्याने न्यायालयाने सर्व ९ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.
- “आमचे हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्यांना कायद्या ने योग्य धडा शिकवला आहे.गेल्या सहा वर्षांपासून आम्ही या न्यायाच्या प्रतीक्षेत होतो.” —
- पीडित कुटुंब (जयराज यांची पत्नी आणि मुलगी)
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






