मुख्याधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती देऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; राहुल बनसोडे यांचा खळबळजनक आरोप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चुकीची माहिती पसरवून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आ रोप जनशक्ती आघाडीचे नेते राहुल बनसोडे यांनी केला आहे.
  • महापुरुषांच्या पुतळ्याच्या ठरावावरून शहरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
  • (महापुरुषांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही: जनशक्ती आघाडीचा खुलासा गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘जनशक्ती आघाडीचा महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध आहे’ अशा वावड्या उठवल्या जात होत्या.
  • यावर स्पष्टीकरण देताना राहुल बनसोडे म्हणाले की, “आ म्ही महापुरुषांच्या पुतळ्याच्या ठरावाला कधीही विरोध केलेला नाही आणि भविष्यातही करणार नाही.
  • मात्र, मुख्याधिकारी या प्रकरणातील प्रशासकीय वस्तुस्थि ती लपवून दिशाभूल करणारी माहिती देत आहेत.
  • स्वतःच्या प्रशासकीय त्रुटींचे खापर आमच्यावर फोडून जा तीय वातावरण दूषित करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.”
  • नगराध्यक्षांवर टीकास्त्र
  • यावेळी बोलताना पाणी पुरवठा सभापती रमेश परदेशी यांनी नगराध्यक्षांच्या भाषेवर आक्षेप घेतला.
  • “नगराध्यक्षांना खालच्या पातळीवर जाऊन बोलणे शोभत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. (तर दोन्ही मुले पराभूत झाल्यामुळे नगराध्यक्ष आमच्याव र राग काढत आहेत का? असा सवाल समरजितसिंह ठा कूर यांनी उपस्थित केला.)
  • तीव्र आंदोलनाचा इशारा
  • पत्रकार परिषदेत जनशक्ती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. प्रशासनाने राजकारण न करता नियमानुसा र काम करावे, असा सल्ला देण्यात आला.
  • “जर प्रशासनाकडून चुकीची माहिती पसरवणे थांबवले ना ही, तर जनशक्ती आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
  • या पत्रकार परिषदेला जनशक्ती आघाडीचे विश्वजित पाटी ल, राहुल बनसोडे, उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर,पा णी सभापती रमेश परदेशी, नगरसेवक मदनसिंह सदिवा ल, विधाते,अनिल शिंदे, अब्बास मुजावर, इस्माईल कुरेशी यांच्यासह जनशक्ती आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या सं ख्येने उपस्थित होते. या खुलाशामुळे आता परंडा शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles