
हातीव ११ संघ ठरला आई शिंब्रादेवी महाचषकाचा मानकरी.
- प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :- दि. ५ एप्रिल २०२६ रोजी विरार येथील खदान मैदानावर जय शिंब्राय वॉरियर्स यांच्या वतीने, मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती, मुंबई सं लग्न भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात, ज ल्लोषात आणि खेळाडूवृत्तीच्या वातावरणात पार पडली.
- पंचक्रोशीतील ही पहिलीच यूट्यूब लाईव्ह स्पर्धा ठरल्यामु ळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभले. या स्पर्धेत हातीव ११ संघाने उत्कृष्ट, दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आई शिंब्रादेवी महाचषक पटकावला.

- तर अंतिम सामन्यात प्रभावी खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. आई शिंब्रादेवी क्रिकेट संघ, ओझरे बुद्रुक यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- स्पर्धेदरम्यान सर्व सहभागी संघांनी शिस्तबद्ध, खेळाडूवृ त्तीने आणि उत्साहाने सहभाग घेत आयोजकांना मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आणि सु रळीत पार पडली.
- समालोचक म्हणून श्री.रुपेश कांबळे आणि श्री.दिलीप पा ष्टे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सामने रंगतदार केले, तर पंच म्हणून श्री.सुधीर डावलं आणि अमोल यांनी अचू क व निष्पक्ष निर्णय देत सामने पार पाडले.
- पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्पर्धेची शो भा वाढवली, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
- यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपणासाठी अभिषेक जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेत महाविजेता हातीव ११, उपविजेता आई शिंब्रादेवी क्रिकेट संघ, तृतीय क्रमांक श्री.राजकोजी, रेवाळेवाडी आंगवली, तर चतुर्थ क्रमांक आर.के.वॉरियर्स, निवधे यांनी पटकावला.
- वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट फलंदाज अक्षय,उत्कृष्ट गो लंदाज आकाश, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रविण हातिम, मालिका वीर समीर बडवे, तर अंतिम सामनावीर आकाश ठरला.
- स्पर्धेसाठी टी-शर्ट प्रायोजित करणारे श्री. नितेश शांताराम सालप यांचे विशेष आभार मानण्यात आले.
- तसेच मान्यवर,प्रेक्षक,समालोचक, पंच, यूट्यूब टीम आणि सर्व सहकाऱ्यांचे आयोजकांनी कृतज्ञतापूर्वक आभार मा नले, पुढील काळातही अशाच प्रकारे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
- विरार नगरीतील खदान मैदानावर क्रिकेटचा महासंग्राम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला असून, पं चक्रोशीतील पहिली यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण स्पर्धा म्हणून या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
- youtube.com @abhishekjadhav08 या माध्यमा तून सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या भव्य स्पर्धे साठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे आयोजकांक डून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






