परंडा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, सोमवारी बेमुदत सामूहिक रजेचा इशारा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- अवैध वाळू उत्खन नावर कारवाई करण्यासाठी जात असताना परंडा येथील तहसीलदार यांच्यावर कार्यालयाच्या आवारातच हल्ला क रण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली.
  • या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कडक कारवाई च्या मागणीसाठी परंडा तहसील कार्यालयातील सर्व अधि कारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि. १६) दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे.
  • नेमकी घटना काय?
  • मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६: ३५ च्या सुमारास अवैध वाळू उत्खननाबाबत माहिती मि ळाल्यानंतर तहसीलदार कारवाईसाठी निघाले होते.
  • यावेळी योगेश परमेश्वर मेटकरी (रा. पिठापुरी) आणि त्या च्यासोबत असलेल्या एका इसमाने तहसील कार्यालया च्या आवारातच तहसीलदारांची गाडी अडवली.
  • योगेश परमेश्वर मेटकरी यांणी आरडाओरडा करत, शिवी गाळ करून गाडीच्या काचांवर प्रहार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
  • तहसीलदारांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता, मेट करी अंगावर धावून आल्याने परिसरात दहशतीचे वाताव रण निर्माण झाले होते.
  • आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
  • संबंधित आरोपी योगेश मेटकरी हा सराईत गुन्हेगार असू न, त्याने दोन वर्षांपूर्वी बावची येथील तलाठी विकास ना गटिळक यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता.
  • त्याच्यावर अवैध गौण खनिज उत्खननाचे अनेक फौजदा री गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई होऊनही आरोपी च्या वर्तनात बदल होत नसल्याने महसूल प्रशासनात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या
    या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असून, भीतीपोटी काम करणे कठीण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
  • आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी कर ण्यात आली आहे.
  • आंदोलनाचे स्वरूप:
  • १६ व १७ एप्रिल: दोन दिवस पूर्णपणे कामबंद आंदोलन.
    २० एप्रिल (सोमवार): आरोपीवर कठोर कारवाई न झा ल्यास बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा.
  • या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला असून, पोलीस प्रशासनाने आरोपी ला तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणीचे निवेदन देण्या त आले आहे.
  • यानिवेदनार मा.तहसीलदार निलेश काकडे, नायब वहसी लदार पूजा गोरे,नायब तहसीलदार विजय कुमार बाडकर, महीदपयवाद भाडकलंकर जाधव, खुने, सातपूते , धुमाळ, स्वामी, वाद्यमारे, अत्तार, व इतर महसूल कर्मच्यारी अधि कारी लिपिक कोतवाल  इत्यादिच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles