दिव्यांग अत्याचार प्रकरणातील आरोपींना बेड्या; आंबी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख  :-परंडा तालुक्यातील चिंचपूर बु. येथे एका दिव्यांग व्यक्तीवर झालेल्या अत्याचा र प्रकरणी आंबी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.
  • या घटनेतील आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून त्यांची रवानगी धाराशिव जिल्हा कारागृहात केली आहे.
  • पोलिसांच्या या त्वरित भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांनी समा धान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
  • नेमके प्रकरण काय?चिंचपूर बु. येथील एका दिव्यांग व्य क्तीला अत्याचार आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले होते.
  • याप्रकरणी दिव्यांग हक्क अधिनियम (कलम ९२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • घटनेचे गांभीर्य ओळखून आंबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड यांनी तपासाची चक्रे वेगाने फि रवली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
  • अटकेनंतर आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात करण्या त आली आहे.
  • पोलीस प्रशासनाचे आभारदिव्यांगांवरील अन्यायाविरोधा त पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल दिव्यांग बांध वांच्या वतीने पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
  • “समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करणाऱ्यांना कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, पोलिसांच्या या कारवाईमुळे आम्हाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे,” असे मत दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले.
  • कठोर शिक्षेची मागणीपोलिसांनी घेतलेली भूमिका कौतु कास्पद असली तरी, संबंधित आरोपींना न्यायालयातून क ठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही दिव्यांग बांधवांनी केली आहे.
  • या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यतत्परतेची च र्चा असून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles