अतिवृष्टीचा घाव सोसूनही ‘ज्ञानेश्वरी’ची उत्तुंग भरारी; गरिबीवर मात करत मिळवले ९१.४० टक्के गुण.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर य शाला गवसणी घालता येते, हे देवगाव खुर्द (ता.परंडा) ये थील ज्ञानेश्वरी सुग्रीव चौधरी या विद्यार्थिनीने सिद्ध केले आहे.
  • २०२५ मधील अतिवृष्टीचा मोठा फटका बसूनही, ज्ञानेश्व रीने दहावीच्या परीक्षेत ९१.४० टक्के गुण मिळवून दैदी प्यमान यश संपादन केले आहे.
  • घरची परिस्थिती आणि संघर्ष:ज्ञानेश्वरीचे वडील सुग्रीव चौ धरी हे अल्पभूधारक शेतकरी असून अत्यंत गरिबीत कुटुं बाचा उदरनिर्वाह करतात.
  • ज्ञानेश्वरी बावची येथील विद्यालयात शिक्षणासाठी जात अ से. घरातून शाळेत जाण्या-येण्यासाठी बसची सोय नस ल्याने आणि परिस्थितीअभावी दुचाकी घेणे शक्य नसल्या ने, ती दररोज पायपीट करत शाळेत जात होती.
  • अतिवृष्टीचे संकट:२०२५ मध्ये परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा तडाखा चौधरी परिवाराला बसला. त्यां च्या घरात पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, जनावरे आणि ज्ञानेश्वरीचे शैक्षणिक साहित्यही वाहून गेले होते.
  • राहत्या घराचे नुकसान झाल्यामुळे आभाळ फाटले होते, मात्र अशा कठीण प्रसंगातही ज्ञानेश्वरीने आपला अभ्यासा चा ध्यास सोडला नाही.
  • शाळेचे साहित्य वाहून गेलेले असतानाही उपलब्ध साधनां च्या जोरावर तिने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला.
  • कौतुकाचा वर्षाव:ज्ञानेश्वरीच्या या यशानंतर परंडा तालु क्यातून तिचे मोठे कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल गावकरी आणि विविध संघटनांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता तालुकाध्यक्ष जमीर शिकलकर, जगन्नाथ चौधरी, सुग्रीव चौधरी, दीपक चौधरी, समाधान पवार, अतुल चौधरी, भरत चौधरी, साक्षी महाडि क यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles