धाराशिवमध्ये वाढत्या जातीय अत्याचारांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- दि. 12 मे 2026 धाराशिव : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या जातीय अत्या चारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत वंचित बहुज न आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मा.रितु खो कर यांची भेट घेऊन अन्यायग्रस्तांना तातडीने न्याय मिळा वा तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडली.
  • वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते मा.अरुण आबा जा धव यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले.
  • यावेळी जिल्ह्यात घडत असलेल्या विविध अत्याचारांच्या घटनांची माहिती देण्यात आली.
  • विशेषतः दलित, वंचित आणि दुर्बल घटकांवर होणारे अ न्याय, सामाजिक तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत गंभीर चर्चा करण्यात आली.
  • शिष्टमंडळाने पोलिस प्रशासनाकडे मागणी केली की, जा तीय अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.
  • तसेच पीडित कुटुंबांना संरक्षण, न्याय आणि शासकीय मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी.
  • समाजात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सं वेदनशील भागांमध्ये पोलिस गस्त वाढवून कायदा व सुव्य वस्था अबाधित ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली.
  • यावेळी पोलिस अधीक्षक मा. रितु खोकर यांनी शिष्टमंड ळाच्या मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून कायद्या च्या चौकटीत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आ श्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
  • या शिष्टमंडळात सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.चंद्रशेखर मडि खांबे, धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा सं घटक विकास बनसोडे, सह प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमा रे, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा ताई लोखंडे, कामगार आ घाडीचे अध्यक्ष सुधीर वाघमारे यांच्यासह अनेक पदाधि कारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  • वंचित बहुजन आघाडीने सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढेही संघर्ष सुरू ठेवणार असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles