
साकत तलाव परिसरातून रोहकलचा तरुण बेपत्ता; परंडा पोलिसांत मिसिंगची नोंद, घातपाताची शक्यता…?
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील रोहकल येथील कृष्णा सतिष शिंदे (वय २६ वर्ष) हा तरुण साकत तलाव परिसरातून बेपत्ता झाल्याची खळबळजन क घटना घडली आहे.
- याप्रकरणी त्याचा भाऊ रमेश सतिष शिंदे याने दिलेल्या जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक २६/ २०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

- मिळालेल्या माहितीनुसार,१२मे २०२६ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रमेश शिंदे यांना गावातील तेजस काटकर याने फोन करून माहिती दिली की, साक त तलावावर महारुद्र जाधव, राम जाधव, गणेश जाधव व अनिरुद्र जाधव यांनी कृष्णा यास काठीने मारहाण केली असून, त्यात त्याचा पाय मोडला आहे.
- तसेच मारहाणीच्या भीतीने कृष्णा याने साकत तलावाती ल पाण्यात उडी मारली असून तो मिळून आला नाही.
- या घटनेची माहिती मिळताच रमेश शिंदे यांनी तात्काळ पुणे येथून साकत तलाव गाठले. तलावाच्या बाजूला कृ ष्णाची पांढऱ्या रंगाची चेतक स्कूटी आणि त्याच्या पाया तील चप्पल मिळून आली.
- तसेच त्याचा मोबाईल चारीच्या वर पडलेला त्याचा मित्र तेजस याला सापडला.
- नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तलावाच्या परिसरात व इतर ठिकाणी शोध घेतला, मात्र कृष्णाचा अद्याप कुठेही पत्ता लागलेला नाही.
- बेपत्ता तरुणाचे वर्णन:नाव: कृष्णा सतिष शिंदे (वय २६, रा.रोहकल)रंग: सावळा, उंची: ५ फूट ३ इंच, चेहरा: उभट, नाक: सरळ.विशेष खूण: उजव्या हाताच्या पोटरीवर महा देवाचे चित्र, त्रिशूळ आणि ‘सोन्या भाऊ’ असे गोंदलेले आहे.
- अंगातील कपडे: पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट.सदर बेपत्ता व्यक्तीबाबत काहीही मा हिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन परंडा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
- या प्रकरणाचा अधिक तपास सपोफौ गजानन मुळे हे करीत आहेत.संपर्क क्रमांक:१) मा. पोलीस निरीक्षक श्री. चोरमले साहेब (पोलीस ठाणे, परंडा)२) पोलीस ठाणे परं डा मो. नं. : 9834485629३) सपोफौ ४९३ गजानन मुळे : 9657816984४) पोहेकॉ १४७५ एस. बी. राऊत : 9822656204.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






