
कृष्णा नगर येथील पाण्याच्या टाकीतून लाखो लिटर पाणी वाया; आधीच्या दुर्घटनेनंतरही निष्काळजीपणा कायम.
- प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड :- कृष्णा नगर येथील पाण्याच्या टाकीमधून आज लाखो लिटर पाणी वाहून वाया गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
- संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि कामचुकारपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरो प करण्यात येत आहे.
- विशेष म्हणजे, याआधी कृष्णा नगर परिसरात पाण्याच्या चिखली परिसरातील कृष्णानगर येथील S-2 पाण्याच्या टाकीवरून सुमारे अर्धा तास पाणी ओव्हरफ्लो होऊन ला खो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

- पाणीपुरवठा विभागातील निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक नागरि कांनी टाकीवर जाऊन पाहिले असता कर्मचारी झोपेत अ सल्याचेही निदर्शनास आले
- दरम्यान, स्थानिक नगरसेविका संगीता (नानी) ताम्हाणे घटनास्थळी पोहोचल्यावर शहरात आधीच कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असताना अशा प्रकारे पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे.
- या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई क रण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित दुर्घटना घडून टाकी पडल्याचा अपघात झाला होता.

- त्या घटनेनंतरही प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतली नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रभाग 11 चे स्थानिक नगरसेवक यांचा निष्काळ जीपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे.
- राष्ट्रवादीचे नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे यांनी कार्य कर्ते दाखवून पाण्याच्या टाकी वरती जाऊन कॉक बंद करण्यास सांगितले.
- स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते मारुती जाध व यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता का ही कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

- त्यामुळे संबंधित हलगर्जी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ता त्काळ कारवाई करून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार मारुती जाधव यांनी केली आहे.
- या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, याआधी झालेल्या अपघातातून धडा न घेतल्याने पुन्हा नि ष्काळजीपणा समोर आल्याची भावना व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






